मला आई व्हायचे आहे - प्रियांका

    दिनांक :08-Sep-2019
बॉलिवूडची देसी गर्ल म्हणजेच  प्रियांका चोप्रा हिला सध्या बाळंतपणाचे वेध लागले आहेत . प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनस हे दोघेही कुठल्या ना कुठल्या कारणाने सतत चर्चेत राहतात. कधी त्यांच्या  लाईफस्टाईलसाठी, तर कधी त्यांच्या हॉट फोटोसेशनसाठी . हॉ़लीवूड असूदे किंवा बॉलिवूड प्रियांकाने या दोन्ही इंडस्ट्री गाजवल्या. पण, प्रियांकाला आता सेटल व्हायचं आहे. तिला मुलं हवी आहेत, अशी इच्छा तिने स्वत: व्यक्त केली.
 
 
वोगच्या सप्टेंबर 2019 साठीच्या एका खास मुलाखतीत प्रियांका चोप्राने तिचे भविष्यातील प्लान सांगितले. यावेळी प्रियांकाने तिला आई व्हायचं आहे, असं सांगितलं. तिची इच्छा आहे की तिला मुलं व्हावी, तसेच तिला निक जोनससाठी लॉस एंजलिसमध्ये एक बंगला विकत घ्यायचा आहे, जिथे ती निकसोबत राहू शकेल.
‘मी तिथेच आनंदी राहते, जिथे माझे लोक असतात. तेच माझं घर होऊन जातं. सध्या मला निक आणि माझ्यासाठी एक शानदार घर विकत घेणे आणि मुलं हे माझ्या प्राथमिक यादीत आहेत’, असं प्रियांकाने सांगितलं. ‘मुंबई आणि न्यू यॉर्कमध्ये तर माझं घर आहे, पण सध्या मी निकसाठी लॉस एंजलिसमध्ये एक घर शोधत आहे. जिथे मी त्याच्यासोबत थोडा चांगला वेळ घालवू शकेल’, असंही तिने सांगितले.