वैमानिकांच्या संपामुळे ब्रिटिश हवाईसेवा कोलमडली

    दिनांक :09-Sep-2019
लंडन,
वेतनाच्या मुद्यावर आक्रमक झालेल्या ब्रिटनमधील वैमानिकांनी बेमुदत संप पुकारल्याने, या देशातील हवाई सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. वैमानिकांच्या संपाचा आज सोमवारी पहिलाच दिवस होता. आज सकाळपासून देशातील कोणत्याही विमानतळावरून एकही विमान उड्डाण घेऊ शकले नाही. वैमानिकांच्या वेतनाचा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेला होता. आम्ही त्यावर तोडगा काढण्यात अपयशी ठरलो, असे ब्रिटिश एअरवेजनने एका जारी निवेदनात म्हटले आहे. ब्रिटिश एअरलाईन्स पायलट असोसिएशनच्या प्रतिनिधींसोबत नव्याने चर्चा करण्याची आमची इच्छा आहे. त्यांनी प्रवाशांची कोंडी होणार नाही, याची काळजी घ्यावी आणि तोडगा काढण्यसाठी आम्हाला काही वेळ द्यावा, असेही या निवेदनात म्हटले आहे.
 
 
 
सर्वच वैमानिक संप पुकारतील, याची आम्हाला माहिती नव्हती. त्यामुळे हा संप किती दिवस चालणार, याविषयी सध्याच काही सांगता येणार नाही. मात्र, वैमानिकांच्या या संपाचा लाखो लोकांवर परिणाम झाला आहे, असे एअरलाईन्सच्या सूत्रांनी सांगितले. वैमानिकांनी आगामी तीन वर्षेपर्यंत वेतनात 11.5 टक्के वाढ करण्याची मागणी केली आहे, पण ब्रिटिश एअरलाईन्सने ती मान्य करण्यास नकार दिल्याने, वैमानिकांनी संप पुकारला आहे.