दुर्दैवी! शेतात काम करताना युवा शेतकऱ्याचा मुत्यू

    दिनांक :09-Sep-2019
गिरड,
शेतात बैल चारत असताना सर्प दंशाने युवा शेतकऱ्याचा मुत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वर्धा जिल्ह्यातील गिरड येथे घडली असून मुत शेतकऱ्याचे नाव अंकुश श्रीरामे असे आहे.
 
 
प्राप्त माहितीनुसार ८ सप्टेबरला अंकुश श्रीरामे हे शेतात बैल चारत असताना शेतातील झाडा खाली लेटले असताना त्याला सापाने चावा घेतला. ही बाब त्याच्या लक्षात येताच त्यांनी आजुबाजुच्या शेतकऱ्यांना सांगितले अंकुशला त्वरीत उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. येथे उपचारादरम्यान त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. 

 
 
घटनेची माहिती गावात पसरताच अंकुशच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ निर्माण झाली. मुत्यक शेतकऱ्याच्या घरीची परीस्थिती हालाखीची असुन तो आपल्या तिन एकर शेती बरोबर रोज मजुरी करून परीवाराची उपजिवीका चालवित होते. त्याच्या अशा दुर्दैवी मृत्यू त्याच्या परीवारावर संकटाचा डोंगर कोसळला आहे. मुत्यक शेतकऱ्यांच्या परीवाराला शासना कडून तातडीने मद्दत देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.