असे मिळवा करलाभ

    दिनांक :09-Sep-2019
कर्मचार्‍यांना मिळणारं वेतन रोख रक्कम आणि रोख रकमेव्यतिरिक्त मिळणार्‍या लाभांचं मिश्रण असतं. रोख रकमेव्यतिरिक्त मिळणार्‍या लाभांना पगाराव्यतिरिक्त मिळणारा भत्ता असं म्हटलं जातं. कर्मचार्‍याच्या हुद्यावर किती आणि कोणत्या प्रकारचा भत्ता मिळणार हे ठरतं. वरच्या हुद्यांवरच्या कर्मचार्‍यांना अधिक लाभ मिळतात. हे लाभांचा पगारात ुहुशारीने समावेश केला तर तुम्ही करात सवलती मिळवू शकता. अर्थात या लाभांच्या माध्यमातून मिळणार्‍या कर सवलतीवर आयकर कायद्यान्वये काही मर्यादा आहेत. प्रत्येक लाभ कर सवलत मिळवून देईलच असं नाही. कोणत्या लाभांमधून तुम्ही करात सवलत मिळवू शकता याविषयी...

 
 
 
कंपनीने कर्मचार्‍यांना भाडेतत्त्वावर वाहन वापरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असेल तर त्याचा हप्ता त्याच्या पगारातून वजा होईल. अशावेळी करपात्र उत्पन्न कमी होईल. मात्र इथे लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे कर्मचार्‍याला गाडीच्या पर्क मूल्यावर कर भरावा लागतो. आयकर कायद्यानुसार 1600 सीसीच्या वाहनासाठी 1800 रुपये प्रती महिना इतक्या पर्क मूल्याला परवानगी असते तर 1600 सीसीपेक्षा जास्तीच्या वाहनासाठी प्रति महिना 2400 रुपये पर्क मूल्याला मान्यता दिली जाते.
 
 
कंपनीची परवानगी असेल तर कर्मचारी वाहन चालवण्यासाठी चालकाची नेमणूक करू शकतात. त्याचा पगार कंपनी कर्मचार्‍याच्या पगारातून कापून घेते. यामुळे तुमचं करपात्र उत्पन्न कमी होतं. चालकाला जास्तीत जास्त 12,000 रुपये पगार देता येतो. चालकाच्या पगाराविरोधात कर्मचार्‍याला प्रति महिना 900 रुपये पर्क मूल्य मिळतं. कर्मचार्‍याच्या उच्च शिक्षणासाठी कंपनीने पैसे खर्च केले तर त्यावर कर्मचारी करात सवलत मिळवू शकतात. जेवणासाठी मिळणारी कूपन्सही करात सवलत मिळवून देतात.