मोदी 27 सप्टेंबरला युनोच्या आमसभेला संबोधणार

    दिनांक :09-Sep-2019
संयुक्त राष्ट्रसंघ,
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 27 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या वार्षिक आमसभेला संबोधित करणार आहेत. न्यू यॉर्क येथील आपल्या आठवडाभराच्या मुक्कामात विविध राष्ट्रप्रमुखांसोबत ते चर्चा करणार आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या वार्षिक आमसभेला या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरुवात होणार आहे. या सभेला कोणकोणते जागतिक नेते संबोधणार आहेत, याबाबतची सुधारित यादी आज जाहीर करण्यात आली. यानुसार मोदी 27 रोजी आमसभेला संबोधित करणार आहेत.
 
 
 
 
 
 
पंतप्रधान मोदी यांनी 2014 मध्ये पहिल्यांदा आम सभेला संबोधित केले होते. यानंतर दुसर्‍या कारकीर्दीत त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघात जागतिक नेत्यांना संबोधित केले होते. जागतिक नेत्यांच्या भाषणाच्या यादीनुसार, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे भाषणही 27 रोजीच ठेवण्यात आले आहे. मोदी यांच्या संबोधनानंतर इम्रान खान भाषण देणार आहेत. या आमसभेसाठी 112 राष्ट्रप्रमुख, 48 सरकारप्रमुख आणि 30 विदेश मंत्री येथे येणार आहेत. 24 सप्टेंबर रोजी या सभेत सर्वसाधारण चर्चा करण्यात येणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्य डोनाल्ड ट्रम्प हे सर्वांत पहिले या सभेला संबोधित करणार आहेत.