वर्ध्याची अवंती खाडे विज्ञान मेळाव्यात जिल्ह्यातून प्रथम

    दिनांक :09-Sep-2019
कारंजा लाड,
कंकुबाई कन्या शाळेची विद्यार्थीनी अवंती गोपाल खाडे हिने अखिल भारतीय विज्ञान मेळाव्यातील वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत जिल्ह्यातून पहिला क्रमांक पटकावला. 
 
 
अखिल भारतीय वाशीम जिल्हा विद्यार्थी विज्ञान मेळावा 4 सप्टेंबर रोजी जे. सी. हायस्कुलमधे आयोजित केला होता. कार्यक्रमाला माध्यमिक शिक्षणाधिकारी तानाजी नरळे, गटशिक्षणाधिकारी मधुसुदन बांडे, संस्थेचे सचिव शिरीष चवरे, मुख्याध्याक प्रा. उदय नांदगांवकर, व अन्य मान्यवर उपस्थित होते. मेळाव्याचा यावर्षीचा विषय "रासायनिक घटकांची आवर्त सारणी:- मानवी कल्याणावर होणारा परिणाम" हा होता.
 
 
जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावल्यामुळे आता ती विभागावर जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे. संस्थेचे सचिव संजिव रुईवाले, मुख्याध्यापिका दिपाली भडंगे, पर्यवेक्षिका मनिषा रायबागकर, विज्ञान शिक्षिका मेघा उफाडे, शुभांगी काळे आदिनी अवंतीचे अभिनंदन केले आहे. ती आपल्या यशाचे श्रेय शाळा व आईवडीलांना देते.