अहेरी,
वर्षोनुवर्षेपासून चालत आलेल्या भारतीय संस्कृती नुसार भारतात अनेक समाजातील नागरिक सलोख्याने सोबत राहत आहेत. याचेच एक उदाहरण म्हणून यावर्षी आलापल्ली येथे मुस्लिमांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
आलापल्ली येथील लाडका राजा गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी गौरी पुत्र, बाप्पा विघ्नहर्ताची स्थापना करण्यात येते आणि अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये आरोग्य शिबीर, गरजूंना मदत, नेत्र तपासणी, चष्मे वाटप आणि दररोज अन्नदानाचे आणि महाप्रसादाचे आयोजनासह अनेक कार्यक्रमांचा समावेश आहे. आलापल्ली येथील नागरिक येथील कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होतात आणि होणाऱ्या कार्यक्रमाचे आणि महाप्रसादाचा लाभ घेत असतात.
यावर्षी सामाजिक समतरतेचे संदेश देण्यासाठी मुस्लिमांच्या वतीने आलापल्लीचा लाडका राजा गणेश मंडळ येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.