प्रियांकानं केलं 'द स्काय इज पिंक'चं पोस्टर शेअर

    दिनांक :09-Sep-2019
मुंबई,
अभिनेत्री प्रियांका चोप्राने 'द स्काय इज पिंक' या तिच्या आगामी सिनेमाचं पहिलं पोस्टर शेअर केलं आहे. या सिनेमात प्रियांकासोबत फरहान अख्तर आणि जायरा वसीम यांच्याही भूमिका आहेत. हा सिनेमा ११ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे.

या बहुप्रतीक्षित सिनेमाची एक झलक या पोस्टरच्या निमित्ताने पाहायला मिळाली आहे. टोरंटो फिल्म फेस्टीव्हलमधील या सिनेमाच्या प्रिमीअरच्या एक दिवस आधी सिनेमाचा पहिला अधिकृत लुक शेअर करण्यात आला. या पोस्टरमध्ये एक सुखी कुटुंब दिसतंय. पोस्टरमध्ये फरहान अख्तर, जायरा आणि रोहित दिसत आहेत. या सिनेमाचा ट्रेलर मंगळवारी लाँच होणार आहे.
सोनाली बोसचा या सिनेमा दीर्घकाळ चर्चेत आहे. डिसेंबरमध्ये प्रियांका आणि निकचं लग्न झाल्याच्या ४ दिवस अगोदरपर्यंत प्रियांका या सिनेमाचं शूटिंग करत होती.