हक्काच्या पेन्शनसाठी तालूक्यातील शिक्षक संघटनांचा एल्गार

    दिनांक :09-Sep-2019
 
मालेगाव,
जुनी पेन्शन योजना लागू करावी, सातव्या वेतन आयोगातील वेतनातील त्रुटी दूर कराव्यात, कंत्राटी धोरण बंद करावे, शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करावे इत्यादी मागण्यांसाठी मालेगाव तालुक्यातील शिक्षकांनी संघटनेच्या आवाहनास प्रतिसाद देत एक दिवसीय लाक्षणिक संपात आपला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. 

 
 
मालेगाव तालुक्यातील एकूण ७०२ कर्मचारी या एक दिवसीय संपात सहभागी झाले होते. यामुळे मालेगाव तालुक्यातील जवळपास सर्वच जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होत्या यामध्ये खाजगी संस्थांचे काही महाविदयालय , विदयालयांचा समावेश होता. यावेळी कर्मचाऱ्याने “हम सब एक है, पेन्शन हमारा हक है ” हा नारा देत गट शिक्षण अधिकारी, गट विकास अधिकारी व तहसीलदार मालेगाव यांना जुनी पेन्शन योजना लागू व इतर मागण्यांचे निवेदन दिले.
 
 
हा संप यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी शिक्षक संघटना, शिक्षक समिती संघटना, सानेगुरुजी शिक्षक सेवा संघ, अखिल भारतीय प्राथ. शिक्षक संघ, काँग्रेस शिक्षक संघटना, अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटना, जुनी पेन्शन हक्क संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, कास्ट्राईब शिक्षक संघटना, केंद्रप्रमुख संघटना इत्यादी संघटनांच्या प्रतिनिधींनीनी प्रयत्न केले.