अखेर 'गुल मकई'च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला

    दिनांक :01-Jan-2020
बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकची चलती आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. बॉलिवूड पटांच्या बायोपिकच्या यादीत आता आणखी एका चित्रपटाचा समावेश होणार आहे. तो चित्रपट म्हणजे, 'गुल मकई'. नोबेल शांती पुरस्कार विजेती मलाला यूसुफजई हिच्यावर आधारीत 'गुल मकई' या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला आहे. या चित्रपटातील जास्तीत जास्त दृश्यांची शुटिंग काश्मिरमध्ये करण्यात आली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अमजद खान असून संजय सिंगला हे चित्रपटाचे निर्माते आहेत.
 
 
gul makai_1  H
 
'गुल मकई'मध्ये रीम शेख मलाला यूसुफजई हिची व्यक्तीरेखा साकरणार आहे. एवढचं नाहीतर या चित्रपटात दिवंगत बॉलिवूड अभिनेते ओम पुरी यांच्यासह दिव्या दत्ता, अतुल कुलकर्णी, मुकेश ऋषी आणि पंकज त्रिपाठी यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 31 जानेवारी, 2020 मध्ये रिलीज होणार आहे. दरम्यान, दिवंगत बॉलिवूड अभिनेते ओम पुरी यांचा प्रदर्शित होणारा हा शेवटचा चित्रपट असणार आहे.
 
या चित्रपटात मलालाच्या साहसी प्रवासाचे आणि तिच्या संघर्षाचे वर्णन करण्यात आले आहे. मलाला 'गुल मकई' या नावाने उर्दू आपला ब्लॉग लिहित होती. तालिबान्यांना आपल्या ब्लॉगच्या माध्यामातून विरोध केल्यामुळे ती शाळेतून घरी जात असताना तालिबानी दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. त्यात ती गंभीर जखमी झाली होती. या घटनेनंतर मलालाच्या कुटुबिंयांनी ब्रिटनमध्ये आश्रय घेतला. जानेवारी महिन्यात लंडनमध्ये संयुक्त राष्ट्रांद्वारे आयोजित करण्यात आलेल्या एका खास कार्यक्रमात हा चित्रपट दाखविण्यात आला होता. ज्यामध्ये देश-विदेशातील 450 दिग्गजांचा समावेश होता. यामध्ये पाकिस्तान आणि भारताच्या उच्च आयोगाचे प्रतिनिधी, ब्रिटिश कार्यकर्ते आणि संयुक्त राष्ट्र व आयआयएमएसएएम चे सदस्यही सहभागी होते.