इच्छाशक्ती वाढवायची तर...

    दिनांक :10-Jan-2020
प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर आपण अशक्य गोष्टही शक्य करू शकतो. इच्छाशक्ती असेल तर दुर्धर आजारांवर मात करता येते. हवी असणारी कोणतीही गोष्ट आपण मिळवू शकतो. म्हणजेच येणारे अडथळे, अडचणी यावर मात करण्यासाठी तीव्र इच्छाशक्ती हवी. काही उपायांनी ही इच्छाशक्ती वाढवता येते. या उपायांविषयी... 
  
iccha _1  H x W
 
  • इच्छाशक्ती वाढवण्याचा उत्तम उपाय म्हणजे उपवास करणं. आपण खाण्यापिण्याची इच्छा मारतो तेव्हा सर्वोच्च पातळीचं स्वनियंत्रण मिळवू शकतो. यामुळे इच्छाशक्ती वाढते.
  • मनावरचा ताण वाढवणार्‍या परिस्थितीला सामोरं जाताना थोडा वेळ थांबा. दोन मिनिटं दीर्घश्वसन करा. इच्छाशक्ती वाढल्याचं तुम्हाला जाणवेल. यामुळे तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल.
  • मनाला सतत निर्णयाची जाणीव करून द्या. निर्णय कितीही कठोर असला तरी त्यावर ठाम रहायला हवं हे मनाला समजावून सांगा. स्वत:च्या निर्णयावर ठाम राहिल्यामुळे इच्छाशक्ती वाढण्यास मदत होते.
  • इच्छाशक्तीवर अपुर्‍या झोपेचा परिणाम होतो हे लक्षात घ्या. त्यामुळे सात ते आठ तासांची शांत झोप घेण्याचा प्रयत्न करा. शांत झोप घेतल्याने मेंदू ताजातवाना होतो. यामुळे तुमची इच्छाशक्ती वाढते. यामुळे कल्पनांची योग्य अंमलबजावणी करणं शक्य होतं.
  • इच्छाशक्तीवर मेंदूचं नियंत्रण असतं. मेडिटेशनमुळे मेंदूला चालना मिळते आणि इच्छाशक्ती प्रबळ होते. संभाव्य अडचणींवर मात करण्यास, तोडगे सुचवण्यास मेंदू सज्ज होतो. मेंदू कार्यक्षम राहण्यास या सर्वाची मदत होते.
  • मेंदू उत्तमरित्या कार्यरत राहण्यासाठी आवश्यक ती पोषणमूल्यं मिळायला हवी. यासाठी आहारात पोषक घटकांचा समावेश असू द्या.
  • मेंदूचं कार्य सुधारण्यासाठी नियमित व्यायाम करा. चालणं हा सर्वोत्तम व्यायाम असू शकतो. यामुळे शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढेल आणि ताजंतवानं वाटेल. यामुळे तुमची निर्णयक्षमता अधिक चांगली होईल आणि इच्छाशक्तीही वाढेल.