वरूणच्या फिटनेसचं रहस्य

    दिनांक :10-Jan-2020
अभिनेता वरूण धवनच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. वरूणची पीळदार शरीरयष्टी, उत्तम बांधा सर्वांनाच आकर्षित करतो. शाळेत असल्यापासूनच त्याने तंदुरूस्तीकडे विशेष लक्ष दिलं आहे. विविध खेळ खेळण्यावरही त्याचा भर असायचा. वरूण दररोज पोहण्याचा व्यायाम करतो. शूटिंगच्या व्यस्त दिनक्रमातूनही वरूण फिटनेससाठी वेळ काढतो. वरूणच्या दिनक्रमाविषयी जाणून घेऊ या. 

varun _1  H x W 
  • व्यायामाला सुरूवात करण्याआधी 10 ते 15 मिनिटं वरुण वॉर्म अप करतो. धावणं, स्नायू ताणणं, उड्या मारणं असे प्रकार तो करतो. यामुळे मुख्य व्यायामाच्या दृष्टीने शरीर तयार होतं.
  • आठवड्यातले पाच दिवस तो व्यायाम करतो. दर दिवशी तो 90 मिनिटांचा व्यायाम करतो. मार्शल आर्टसपासून वेट लिफ्टिंगपर्यंत विविध प्रकारच्या व्यायामाचा यात समावेश असतो. योगासनांवरही त्याचा भर आहे. दररोज किमान 15 मिनिटं तरी तो पोहतो.
  • व्यायाम करण्यासाठी स्वत:च्या मनाची तयारी करणं गरजेचं असतं. व्यायामाची प्रेरणा मिळायला हवी. हे काम माझा फिटनेस प्रशिक्षक करतो, असं वरूण सांगतो.
  • शरीर आपल्याला बरंच काही सांगत असतं, हे आपण जाणून घ्यायला हवं. शरीराचे संकेत जाणून घेतले नाहीत तर दुखापत होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे स्नायू किंवा अवयव दुखत असेल तर तातडीने उपचार करायला हवेत, असं वरू णचं म्हणणं आहे.