रजनीकांतच्या चाहत्यांमध्ये 'दरबार'चे क्रेझ

    दिनांक :10-Jan-2020

darbar_1  H x W 
 
मुंबई,
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांचा दरबार सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. अपेक्षेप्रमाणे पहिल्याच दिवशी रजनीकांत यांच्या चाहत्यांनी सिनेमागृहात रांग लावली होती. काहींनी दरबारच्या पोस्टरवर माळ घातली तर काहींनी दुधाचा अभिषेक केला. हे कमी की काय काही कट्टर चाहत्यांनी तर त्यांच्या नावाने सिनेमागृहात पूजाही घातली.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
दक्षिणेतील राम सिनेमा थिएटरमध्ये ढोल- नगाड्यांनी दरबार सिनेमाचे स्वागत करण्यात आले. सिनेमा पाहण्यापूर्वीच थिएटरच्या प्रांगणात चाहत्यांनी रजनीकांत यांच्या सिनेमाचे नाचत- गात स्वागत केलं. अनेक चित्रपटगृह ही नवऱ्या मुलीसारखी सजवण्यात आली होती. राम सिनेमाजच्या राम मुथुराम थिएटरची इमारत पूर्णपणे एलईडी लाइटने सजवली होती.
 
 
 
 
 
 
 
रजनीकांत यांच्यासाठीच प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी त्यांचे चाहते सोडत नाहीत. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी सिनेमाच्या भल्या मोठ्या कटआउटवर फुलांचा हार चढवण्यात आला होता. एवढंच नाही तर केळ्यांच्या पानांनी आणि पारंपरिक पद्धतीने अनेक चित्रपटगृह सजवण्यात आली होती.
 
रजनीकांत यांचा दरबार सिनेमा यशस्वी व्हावा यासाठी काही चाहत्यांनी पूजापाठही केले. बँगलोर येथील कावेरी चित्रपटगृहात रजनीकांत यांचा भलामोठा कटआउट ठेवण्यात आला होता. या कटआटलाही मोठ्या फुलांच्या हारांनी सजवण्यात आलं होतं. सिनेमाचा पहिला शो पहाटे ४ च्या सुमारास सुरू झाला असता चाहत्यांनी पहाटे ३- ३.३० च्या सुमारास फटाक्यांची आतषबाजी केली.