इराणमधील ब्रिटिश राजदूताला अटक

    दिनांक :12-Jan-2020
लंडन,
तेहरानमधील ब्रिटिश राजदूताला इराण प्रशासनाने शनिवारी अटक करण्यात आली. इराण शासनाच्या विरोधात निदर्शने करीत असताना ब्रिटिश राजदूताला अटक करण्यात आली, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉमिनिक राब यांनी दिली.
 

rob macaire_1   
 
 
आमच्या राजदूताला तेहरान येथे अटक करण्यात आली. ही अटक कोणत्या आधारावर, तसेच कोणते आंतरराष्ट्रीय कायदे मोडल्याने करण्यात आली, याबाबत माहिती देण्यात आली नाही, असे राब यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. रॉब मॅकेअर असे अटक केलेल्या राजदूताचे नाव आहे.
 
 
इराण मर्यादा सोडून वागत आहे, असा इशारा त्यांनी दिला. इराणने राजनयिक माध्यमातून तणाव कमी करण्यासाठी पाऊल उचलावे अथवा परिणामांना सामोरे जावे, असेही त्यांनी सांगितले. युक्रेनचे विमान अपघाताने पाडण्यात आले, अशी कबुली इराणने दिल्यानंतर तेहरानमध्ये आयोजित निदर्शनांमध्ये रॉब मॅकेअर सहभागी झाले होते. त्यांना जवळपास तासभराने मुक्त करण्यात आले, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले. तेहरानमधील निदर्शनांमध्ये सहभागी झालो नसल्याचा दावा ताब्यात घेण्यात आलेला राजदूत रॉब मॅकेअर यांनी केला.