जुई गडकरी म्हणाली जगले वाचले तर उद्या भेटू!

    दिनांक :12-Jan-2020
मुंबई,
अभिनेत्री जुई गडकरी सध्या मालिकांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. दिवसभरातील अनेक गोष्टी जुई चाहत्यांसोबत शेअर करत असते. काल जुईने एक पोस्ट शेअर केल्यानंतर तिच्या चाहत्यांना काहीसे टेन्शन आले. तिने चक्क 'जगले वाचले तर उद्या भेटू' असे कॅप्शन देत एक स्टोरी शेअर केली होती. 
 
jui _1  H x W:
खरं तर यात टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही...त्याचं झालं असं की एका कार्यक्रमानिमित्त जुई नागपूरात गेली होती. नागपुरची थंडी जुईला सहन होत नव्हती. त्यामुळे तिने तापमानाचा एक स्क्रीनशॉट शेअर करत 'जगले वाचले तर उद्या भेटू'! अशी स्टोरी शेअर केली. तिने शेअर केलेल्या फोटोत नागपुरच्या तापमानाचा पारा १२ डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली उतरल्याचे पाहायला मिळते.

jui _1  H x W:
जुईनं आणखी एक व्हिडिओ शेअर करत असली थंडी खूप दिवसांनी अनुभवली असल्याचे सांगितले. जुईच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर 'पुढचं पाऊल' आणि 'बिग बॉस मराठी'तून ती घराघरात पोहोचली. जुई सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवरही ती बऱ्याचदा फोटो आणि व्हडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.