तान्हाजी चित्रपटाचे तिकीट दाखवा आणि करा मोफत प्रवास!

    दिनांक :12-Jan-2020
अजय देवगणचा 'तान्हाजी-अनसंग वॉरिअर' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरत आहे. चित्रपटाची तरुणाईमध्ये कमालीची क्रेज दिसत आहे. चित्रपट अधिकाधिक लोकांनी पाहावा आणि तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा कहाणी सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी राजापूर तालुक्यातील कोंड्ये येथील श्री भगवती ट्रॅव्हल्सचे मालक संतोष धुरत यांनी अनोखा उपक्रम सुरु केला आहे..
 
tanhaji 1_1  H
तान्हाजी हा चित्रपट पाहिल्याचे चित्रपटगृहाचे तिकीट दाखवा आणि राजापूर कोंड्ये ते मुंबई खासगी आराम बसचे एक तिकीट मोफत मिळवा, अशी ऑफर आपल्या ग्राहकांना भगवती ट्रॅव्हल्सने दिली आहे. त्याला चांगलाच प्रतिसादही मिळत आहे. 21 जानेवारी 2020 पर्यंत ही ऑफर सुरु राहणार आहे.
संतोष धुरत कायमच सामाजिक कामात अग्रेसर असतात. कोंड्ये गावात त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. आपला व्यवसाय संभाळून ते असे उपक्रम राबवतात.अजय देवगणचा तान्हाजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर तो हिट ठरत आहे. आता धुरत यांनी आपल्या प्रवाशांना तान्हाजी हा चित्रपट पाहिला असल्याचे तिकीट दाखवा आणि राजापूर कोंड्ये ते मुंबई खासगी आराम बसचे एक तिकीट मोफत मिळवा अशी वेगळी ऑफर दिली आहे. यातून या चित्रपटाची प्रसिद्धी करण्याबरोबरच आपल्या ग्राहकांना काहीतरी वेगळा अनुभव त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे. जास्तीतजास्त ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घ्यावा असे, आव्हान धुरत यांनी केले आहे.