“आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाशी भाजपाचा संबंध नाही”

    दिनांक :13-Jan-2020
मुंबई,
आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाशी भाजपाचा काहीही संबंध नाही. ते एका लेखकाने मांडलेले विचार आहेत. या पुस्तकाला नावही जयभगवान गोयल यांनीच दिले आहे. त्यामुळे या पुस्तकाशी पक्षाचा काही संबंध नाही असे भाजपाचे राष्ट्रीय मीडिया को हेड डॉ. संजय मयुख यांनी स्पष्ट केले आहे. भाजपा महाराष्ट्र या ट्विटर हँडलवर संजय मयुख यांची प्रतिक्रिया ट्विट केली आहे.

goyal_1  H x W: 
आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाच्या शीर्षकावरुन वाद झाल्यानंतर भाजपाने पक्षाचा या पुस्तकाशी संबंध नाही असे म्हटले आहे. तसेच जयभगवान गोयल यांनी या प्रकरणी माफी सुद्धा मागितली आहे. कुणाच्या भावना दुखावल्या असतील ते मी हेतूपुरस्सर केले नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे या पुस्तकावरुन एवढा वाद निर्माण होण्याची गरज नाही असेही मयुख यांनी म्हटले आहे.
 
‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांनी पक्षाने आदेश दिला तर पुस्तक मागे घेऊ असे म्हटले आहे. यावेळी त्यांनी ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज काम करायचे त्याप्रमाणे नरेंद्र मोदी काम करत असल्याने आपण त्यांचा उल्लेख महाराजांच्या नावे केला असल्याचे सांगितले. तसेच कोणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता असेही ते म्हणाले आहेत.