तिहारमध्ये निर्भयाच्या दोषींच्या फाशीची तालिम

    दिनांक :13-Jan-2020
नवी दिल्ली,
निर्भया बलात्कार व हत्याकांड प्रकरणातील दोषींना फासावर लटकविण्यासाठी आता फक्त 9 दिवस शिल्लक असल्याने, रविवारी या फाशीची रंगीत तालिम पार पाडण्यात आली, अशी माहिती कारागृहातील अधिकार्‍यांनी दिली.
 

hang_1  H x W:  
 
तिहारच्या तुरुंग क्रमांक 3 मध्ये ही तालिम करण्यात आली. निर्भया प्रकरणातील दोषी मुकेशिंसह, विनय शर्मा, अक्षय ठाकूर आणि पवन गुप्ता या चौघांना 22 जानेवारी रोजी फासावर लटकविण्यात येणार आहे. फाशीच्या या तालिमेसाठी 4 पोत्यांमध्ये एकेका दोषीच्या वजनाइतकी माती आणि दगड भरण्यात आले होते. ही पोती दोरीला लटकविण्यात आली. यावेळी कारागृह अधीक्षक आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
 
 
पवन जल्लादच देणार फासी
दरम्यान, या चारही दोषींना फासावर लटकविण्यासाठी उत्तरप्रदेशच्या मेरठ येथील पवन जल्लादचे नाव निश्चित करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पवनच्या मदतीला आणखी एक जल्लाद असू शकतो. या चौघांनाही एकचवेळी फासावर लटकविण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
 
चौघांसोबत नियमित संवाद
फाशीच्या तारखेपर्यंत चारही दोषींची मानसिक स्थिती उत्तम राहावी, यासाठी कारागृहातील अधिकारी त्यांच्यासोबत नियमित संवाद साधत आहेत. याशिवाय, त्यांच्या आरोग्याचीही दररोज तपासणी केली जात आहे.