चार दिन की चांदनी होती है, टेस्ट क्रिकेट नही

    दिनांक :13-Jan-2020
-वीरेंद्र सेहवागची फटकेबाजी
मुंबई, 
फलंदाजी असो अथवा टीका वीरेंद्र सेहवागची फटकेबाजी नेहमीच अफलातून असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद सध्या विचार करीत असलेल्या चार दिवसीय कसोटी सामन्यांबद्दल त्याने अशीच बोचरी आणि अफलातून टीका केली. ‘चार दिन की चांदनी होती है, टेस्ट क्रिकेट नही,’ अशी घणाघाती टीका त्याने येथे रविवारी रात्री केली. 
 
viru _1  H x W:
 
 
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यातील मन्सूर अली खान पतोडी स्मृती व्या‘यानात बोलताना त्याने ही टीका केली. यावेळी त्याने हिंदीतील काही म्हणींचा चपखल वापर करीत घणाघात केला. ‘जल की मछली जलमे अच्छी है, बाहार निकालोगे तो मर जायेगी, असे वक्तव्य त्याने चार दिवसीय कसोटी सामन्यांवर केले. आपण कसोटी क्रिकेट चंदामामाजवळ नेऊ शकतो, असे त्याने दिवस-रात्र कसोटी क्रिकेटवर भाष्य करताना म्हटले. नवकल्पनांचे स्वागतच आहे. पण, त्या पाच दिवसीय कसोटी क्रिकेटमधील हव्यात. या खेळाचे दिवस कमी करता कामा नये, असेही त्याने सांगितले.
 
 
 
कसोटी क्रिकेट ही प्रणयासारखी अलवार भावना आहे. प्रेयसीच्या होकाराची एखादा प्रेमवीर जशी प्रतीक्षा करतो, तशीच प्रतीक्षा स्लिपमधील खेळाडू दिवसभर किमान एखादा झेलाची करीत असतो. फलंदाजाला बाद करण्यासाठी गोलंदाज क्षेत्ररक्षण लावतो आणि फलंदाज त्यावर कुरघोडी करीत मोठी खेळी करण्याचा प्रयत्न करतो, हे या खेळातील सौंदर्य असल्याचेही त्याने सांगितले.