समाजाच्या विकासासाठी संघटीत राहण्याची गरज : खा. धानोरकर

    दिनांक :13-Jan-2020
धनोजे कुणबी समाजाचा उपवर-वधू परिचय मेळावा
भद्रावती,
देशात होणार्‍या येत्या जनगणनेत इतर मागास समुदायाची जनगणना स्वतंत्र पध्दतीने झाली पाहीजे. यासाठी संसदेत आवाज उठवीला. इतर मागास समुदायाची जनगणना व्हावी. या मागणीचे पडसाद विधिमंडळातही उमटले. धनोजे कुणबी हा समाज इतर मागास घटकाचा अत्यंत महत्वाचा आणि अविभाज्य घटक आहे. आपला समाज ग्रामीण क्षेत्रात विखुरलेला आहे. बदलत्या काळानुरुप सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय प्रगतीची परिभाषा बदललेली आहे. सर्वच क्षेत्रात यशोशिखर गाठायचे असल्यास सामाजिक संघटन मजबूत करण्याची आवश्यकता आहे. आपआपसातील निरर्थक स्पर्धा संपुष्टात आणून संपूर्ण धनोजे कुणबी समाजाने समाजाच्या विकासाकरिता संघटीत राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन खासदार बाळु धानोरकर यांनी केले.
भद्रावती येथे आयोजित धनोजे कुणबी समाजाच्या उपवर-वधू परिचय मेळाव्याचे उद्‌घाटक म्हणून ते मार्गदर्शन करीत होते. याप्रसंगी धानोरकर यांनी, येथील धनोजे कुणबी समाजाच्या समाजिक भवनाचा प्रश्र्न निकाली काढण्यासाठी जागा नसल्यास ती खरेदी करावी बांधकामासाठी निधी कमी पडणार नाही, असे आश्र्वासन दिले.
कार्यक‘माच्या अध्यक्षस्थानी विदर्भ मध्यवर्ती समिती धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष  ॲड. पुरूषोत्तम सातपुते, प्रमुख पाहूणे
 
 
danorkar_1  H x
 
म्हणून ॲड. बाबासाहेब वासाडे, माजी जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, आशिष तायवाडे, विलास राजुरकर,  ॲड. अंजली साळवे, आस्थादायी मंडळाचे कार्याध्यक्ष प्रा. धनराज आस्वले आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते या मेळाव्या निमित्याने काढण्यात आलेल्या ‘नाती आपूलकीची 2020’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. या स्मरणिकेत विवाह इच्छूक 625 मुली आणि 403 मुलांची नोंद करण्यात आली. या प्रसंगी उपवर -वधू परिचय मेळाव्यात सर्वप्रथम लिना बतकी, सोनाली बतकी, वर्षा लांबट, नम‘ता लांबट आणि ज्योती आसुटकर यांनी परिचय दिला.
यावेळी ॲड. पुरुषोत्तम सातपूते यांनी, समाजापुढे अनेक प्रश्र्न असल्याचे सांगुन विखुरलेला समाज समितीच्या माध्यमातून एकत्रीत करण्यासाठी सतत प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले. परीचय देण्यासाठी मुली फार मोठया सं‘येत पुढे येतात. परंतु मुले मात्र मागे पडतात. हे चित्र यापुढे बदलले पाहीजे असेही ॲड. सातपुते यांनी यावेळी म्हटले. येत्या 8 व 9 फेबुवारी रोजी चंद्रपूर येथे संपन्न होणार्‍या शेतकरी मेळाव्यात आपण सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. कार्यक‘माचे प्रास्ताविक आस्थादायी समाज मंडळ धनोजे कुणबीचे अध्यक्ष पांडूरंग टोंगे यांनी केले. संचालन वैशाली टोंगे यांनी, तर आभार उर्मिला बोंडे यांनी केले.