विश्वचषक स्पर्धेमुळे भारताला जागतिक मान्यता मिळेल

    दिनांक :13-Jan-2020
नवी दिल्ली,
17 वर्षांखालील महिला विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनामुळे भारतीय फुटबॉलला जागतिक मान्यता मिळेल, असा विश्वास अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी व्यक्त केला. 
 
prafu_1  H x W:
 
 
येथे फुटबॉल महासंघाची आज आमसभा झाली. त्यावेळी पटेल यांनी हा विश्वास व्यक्त केला. या सभेसाठी महासंघाचे सरचिटणीस कुशल दास, वरिष्ठ उपाध्यक्ष सुब‘ता दत्ता, के. एम. आय. माथर, मानवेंद्रिंसह आणि कार्यकारिणीतील सर्वच सदस्य उपस्थित होते. मात्र, जम्मू-काश्मीर आणि राजस्थान महासंघाचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते. यंदाच्या वर्षात भारताकडून 17 वर्षांखालील महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जात आहे. या स्पर्धेमुळे फुटबॉल क्षेत्रात भारताला जागतिक पातळीवर ओळख मिळेल. यापूर्वी 2017 मध्ये भारतात आयोजित केलेल्या याच स्पर्धेमुळे आपल्या देशाची पालटली होती, असे त्यांनी सांगितले.