इराकमधील अमेरिकी सैन्य तळावर पुन्हा क्षेपणास्त्र हल्ला

    दिनांक :13-Jan-2020
बगदाद,
कासिम सुलेमानी यांच्या हत्येनंतर इराण आणि अमेरिकेमध्ये वाढलेला तणाव अद्याप कमी झालेला नाही. अमेरिकेविरोधात आक्रमक झालेल्या इराणने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. रविवारी इराणी सैन्याने अमेरिकेच्या इराकमधील बलाद येथे असलेल्या हवाई दलाच्या तळावर पुन्हा एकदा क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. इराणकडून अमेरिकेच्या या तळावर एकूण आठ रॉकेट डागण्यात आली. यामध्ये इराकी हवाई दलाचे दोन अधिकारी आणि दोन सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी रात्री उशीरा ही माहिती समोर आली आहे.
 

rocket attack_1 &nbs
 
बगदादपासून साधारण ७० किलोमीटर उत्तरेस स्थित असलेल्या अल-बलाद हवाई तळावर कत्युशा श्रेणीचे आठ रॉकेट सोडण्यात आले होते. अल-बलाद हवाईतळ हे इरकामध्ये अमेरिकी हवाईदलाचे प्रमुख तळ मानले जाते. इराक आपल्या ‘एफ-१६’ या लढाऊ विमानांना देखील या ठिकाणीच ठेवतो. या हल्ल्यात अमेरिकी सैन्याला कोणतीही इजा झाली, नसल्याची माहिती समोर आली आहे.
 
 
मागील दोन आठवड्यांपासून इराण बरोबर तणाव वाढल्यापासून या ठिकाणाहून बहुतांश अमेरिकी सैन्य काढण्यात आलेले आहे. हल्ला करणारे क्षेपणास्त्र नेमके आले कुठून हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. इराणने आपले सर्वोच्च लष्करी कमांडर कासिम सुलेमानीच्या हत्येनंतर मागील आठवड्यात याच सैन्य तळावर क्षेपणास्त्र हल्ला झाला होता. अमेरिकेने बगदादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाईहल्ला करून इराणचे सर्वोच्च लष्करी अधिकारी कासिम सुलेमानीला ठार मारल्यापासून आखातात तणाव निर्माण झालेला आहे.