यूपीएससीच्या आयईएस परीक्षेत जेएनयूच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश

    दिनांक :13-Jan-2020
नवी दिल्ली,
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) भारतीय अर्थशास्त्र सेवेच्या (आयईएस) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. सध्या हिंसाचार आणि आंदोलनामुळे चर्चेत असलेल्या नवी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या १८ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळवले आहे. भारतीय अर्थशास्त्र सेवेच्या परीक्षेत जेएनयूच्या विद्यार्थ्यांचाच बोलबोला पाहायला मिळाला आहे.
 
 

jnu college_1   
 
भारतीय अर्थशास्त्र सेवेत देशस्तरावर केवळ ३२ जागा असतात. यातल्या १८ जागा जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी पटकावल्या आहेत. यामुळे, जेएनयूतमधल्या शिक्षणाचा दर्जा इतर विद्यापीठांपेक्षा उत्तम असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. ५ जानेवारीला जेएनयूमध्ये हिंसाचार झाला. विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना जबर मारहाण करण्यात आली. यावरुन, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्या संघटनांनी एकमेकांवर आरोप केले आहेत.