जस्टिन बीबर दुर्दम्य आजाराने ग्रस्त

    दिनांक :13-Jan-2020
आंतरराष्ट्रीय दर्जाचा गायक जस्टिन बीबरचे कोट्यवधी चाहते आहेत. त्याची एक झलक पाहता यावी म्हणून त्यांची वाट्टेल ते करायची तयारी असते. पण त्यांच्यासाठी एक वाईट बातमी आहे. जस्टीनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सांगितले की त्याला लाइम नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. जस्टिनने सांगितले की, या आजाराचा त्याची त्वचा, मेंदू, एनर्जी आणि पूर्ण आरोग्यावर परिणाम होत आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्येच जस्टिन बीबरने त्याचं दुःख व्यक्त केलं.

justin_1  H x W
तो म्हणाला की, जेव्हा लोक म्हणतात की बीबर खराब दिसतो तेव्हा त्यांना हे कळत नाही की मी लाइम आजाराने ग्रस्त आहे. लोकांना हे कळत नाही की, क्रोनिक मोनोचा माझ्या त्वचा, मेंदू आणि एनर्जीवर परिणाम होतो. एवढं असूनही मी लढत आहे. या आजाराबद्दल जस्टिन बीबर यूट्यूबवर प्रदर्शित होणाऱ्या डॉक्यूमेण्ट्रीमध्ये देणार आहे. बीबर पुढे म्हणाला की, या आजारातून बाहेर पडण्याचा आणि पूर्ण बरा होण्याचा तो प्रयत्न करत आहे. त्यालाही टोपी न घालता प्रेक्षकांच्या समोर यायचं आहे.
लाइम हा एक संसर्गजन्य रोग आहे. बोरेलिया बर्गडोरफेरी या बॅक्टेरियामुळे हा रोग होतो. हा संसर्गजन्य रोग ब्लॅकलेड टिक चावल्यामुळे होतो. या आजारात रुग्णाला ताप येणं, त्वचेवर चट्टे उमटणं, डोकेदुखी आणि सूज येणं यांसारख्या गोष्टी सतत होत असतात.