नेपाळचा भारत, चीनशी संबंध जपण्याचा प्रयत्न

    दिनांक :13-Jan-2020
काठमांडू,
भारत आणि चीन ही शेजारील राष्ट्रे अडचणीत येतील, अशा पद्धतीचे कार्यक्रम राबविण्यापासून आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थांना परावृत्त करण्यासाठी नेपाळ नवे धोरण आखत आहे, अशी माहिती नेपाळ सरकारमधील अधिकार्‍यांनी दिली.
 
 

flag2_1  H x W: 
 
 
भारत-नेपाळ सीमाभागात फोफावणारा दहशतवाद आणि होणार्‍या गुन्हेगारी कारवायांबाबत भारताने वेळोवेळी चिंता व्यक्त केली आहे; तर नेपाळद्वारे तिबेटी आंदोलने सुरू असल्याची तक्रार चीनने यापूर्वीच केली आहे. या पृष्ठभूमीवर नेपाळ सरकार भारत आणि चीनशी असलेले संबंध बिघडणार नाही, यासाठी नवे धोरण आणत आहे.
 
 
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, माहिती अधिकारी दुर्गाप्रसाद भट्टराय यांनी सांगितले की, सीमाभागात स्वयंसेवी संस्थेद्वारे राबविल्या जाणार्‍या उपक्रमांवर नेपाळ सरकारचे लक्ष आहे, याची खात्री शेजारील देशांना देणे, हा प्रस्तावित धोरणामागील प्रमुख हेतू आहे; तसेच सीमाभागात मदरसे किंवा मठ उभारण्याच्या नावाखाली स्वयंसेवी संस्था राबवित असलेल्या कार्यक्रमांवरही सरकारचे लक्ष असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.