शिवसेना भवनात बाळासाहेबांना शिवाजी महाराजांपेक्षा वरचे स्थान का?- निलेश राणे

    दिनांक :13-Jan-2020
मुंबई,
भाजप नेते जय भगवान गोयल यांच्या 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून पेटलेल्या वादात आता नारायण राणे यांचे सुपूत्र आणि भाजप नेते निलेश राणे यांनी उडी घेतली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत या मुद्द्यावरून कालपासून भाजपला लक्ष्य करत आहेत. मात्र, निलेश राणे यांनी एक बिनतोड सवाल विचारत संजय राऊत यांना कोंडीत पकडले आहे.

shivsena bhawan_1 &n
निलेश राणे यांनी मुंबईतील शिवसेना भवनाचे छायाचित्र ट्विट केले आहे. सेना भवनात आमच्या महाराजांपेक्षा स्व. बाळासाहेबांना वरचे स्थान का दिले? संजय राऊत यावर कधी बोलणार?, असा सवाल निलेश राणे उपस्थित केला आहे. या छायाचित्रात शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या वरच्या भागात बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे या अडचणीच्या प्रश्नाला आता शिवसेना कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याशिवाय, निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीला जाऊन टीका केली आहे. मराठ्यांनी काय करावे ते पवारांच्या कुत्र्याने सांगू नये, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि राणे परिवारामध्ये पुन्हा एकदा जुंपण्याची शक्यता आहे.