मुंबई विमानतळाच्या इमारतीवरून उडी घेत अधिकाऱ्याची आत्महत्या

    दिनांक :13-Jan-2020

suicide on mumbai ariport

मुंबई,
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या इमारतीवरून उडी घेत एका अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास टर्मिनल २ च्या पार्किंगच्या इमारतीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेमुळे विमानतळ परिसरात एकच खळबळ उडाली.
अभिषय बाबू असे आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याने नाव आहे. ते इमिग्रेशन ब्युरोमध्ये ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर पदावर कार्यरत होते. इमारतीवरून उडी मारल्यानंतर जखमी अवस्थेतल्या अभिषय यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.