संसदेचे नाही, तर मग विद्यार्थ्यांना नक्षलवाद्यांचे कायदे शिकवणार का?

    दिनांक :14-Jan-2020

मुंबई,
संसदेच्या दोन्ही सभागृहात पारित झालेला. देशाच्या राष्ट्रपतींंची स्वाक्षरी झालेला व अधिसूचना निघालेल्या कायद्याबाबत विद्यार्थ्यांना बोलू नका, शिकू नका, समजून घेऊ नका, असे फतवे राज्याच्या शालेय शिक्षण व पर्यावरण मंत्री काढत आहे; मग आता राज्यातील विद्यार्थ्यांना नक्षलवाद्यांचे कायदे शिकवणार का, असा उपरोधिक सवाल भाजपा नेते, आमदार आशीष शेलार यांनी केला आहे. 
 
shelar _1  H x
 
 
महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारचे नवे धोरण झाले आहे की काय, असे वाटत आहे. ‘आले युवराजाच्या मनी...’ असे हे धोरण आहे. त्या युवराजाच्या मनी आल़े की, आघाडी सरकारचे धोरण झाले. या राज्यात कायदा सुव्यवस्था, नियम नियमावली आहे. नागरिकत्व कायद्याचा कार्यक्रम कुणी करायचा आणि कुणी करायचा नाही. याबाबत नियमावली आहे. या कायद्याचा विरोध करणारे आझाद मैदानात एकत्र झाले. त्यांना परवानगी देण्यात आली. कायद्याचे समर्थन करणारे ऑगस्ट क्रांती मैदानात एकत्र आले, त्यांना परवानगी देण्यात आली नाही. त्यानंतरचा दुसरा टप्पा असा की, आता या कायद्याचा कार्यक‘म शाळेत नाही, शाळेच्या प्रांगणातही नाही, शाळेच्या व्यवस्थापनाने आयोजित केलेला नाही किंवा दुसर्‍या अन्य ठिकाणीही शाळेने कार्यक‘म केलेला नाही. दुसर्‍याच ठिकाणी शाळेतील मुले एकत्र येऊन कायद्याच्या समर्थनार्थ कार्यक‘म झाला, तर मग शाळेवर कारवाई का? हा अजब न्याय कुठला? असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला.
 
 
या राज्यात शिक्षण मंत्री, पर्यावरण मंत्री जर केंद्रीय कायदा वाचू नका, त्याचा अभ्यास करू नका, असे बंधन तरुणांवर किंवा विद्यार्थ्यांना कसे घालू शकतात, असे वागणे आता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणारे नाही का, संसदेत पारित झालेला कायदा अभ्यासाचा नाही, तर मग नक्षलवाद्यांचे जंगली कायदे सरकार विद्यार्थ्यांना शिकवणार का? असा खडा सवालही शेलार यांनी केला आहे.