सिरोंचा येथील दिव्यांग मेळाव्याचे तहसीलदार रमेश जसवंत यांच्या हस्ते उदघाटन

    दिनांक :14-Jan-2020


samuhik vivah_1 &nbs

विदर्भ पटवारी संघ शाखा सिरोंचाकडून दोन हजार दिव्यांगांसाठी मोफत जेवणाची व्यवस्था
 मेळाव्याला तालुक्यातील दिव्यांगाची तुंबळ गर्दी
सिरोंचा,
महसूल विभाग,पंचायत व आरोग्य विभागा अल्मीको संस्थेकडून तालुक्यातील दिव्यांगांना सरकारची नाविन्यपूर्ण योजनेचे लाभ मिळावे व नवीन दिव्यांगाची नव्याने नोंदणी करण्यासाठी शहरातील जिल्हाल परिषद माध्यमिक शाळेचे मैदानावर भव्य शिबीर व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याचे उदघाटन सिरोंचाचे तहसीलदार रमेश जसवंत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्तीत होते. या मेळाव्यात येणाऱ्या दिव्यांगांसाठी विदर्भ पटवारी संघ शाखा सिरोंचा कडून तब्बल दोन हजार रुग्णांसाठी मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आली. दिव्यांग मेळाव्यासाठी विविध विभागाचे स्टॉल्स व मदत केंद्र ठेवण्यात आले. या मेळाव्याला तालुक्यातील दिव्यांगानी तुंबळ गर्दी केली असून विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी,स्वयंसेवकांनी दिव्यागांना योग्य मार्गदर्शन करीत आहे.