दक्षिण कोरिया

    दिनांक :14-Jan-2020
निलेश जठार
9823218833
 
दक्षिण कोरिया हा अशियातला प्रगत असा देश. या ठिकाणी अनेक असे शहर आहेत, जे पर्यटनाच्या दृष्टीने फार सुरेख आणि मोहक आहेत. साधारण प्रत्येक शहरात तुम्हाला सर्व सुविधांनी नटलेले प्रगत असे शहर अनुभवायला मिळेल. मॉल्स,. मोठंमोठ्या इमारती, गार्डन, शॉपिंग बाजार, रेस्टॉरेंट आणि सिनेमा हॉल असे सगळे मनोरंजनात्मक गोष्टी तुम्हाला दक्षिण कोरियाच्या प्रत्येक शहरात सापडतील तसेच दक्षिण कोरियाचा ग्रामीण भाग पण फार सुरेख आहे . उंच उंच पहाड, झुळझुळत्या संगीताची निर्मिती करणारे निर्झर, दाट जंगले, विपुल वनसंपदा, काळेपांढरे पत्थर, दूरवर पसरलेले समुद्री तट, फुले पाने, अशी हरखून जाणारी निसर्गदृष्ये जगातील अनेक देशांत पाहायला मिळतात. निसर्गाचे हे स्वर्गसुख उपभोगण्यासाठी पर्यटक अशा देशांना भेटही देतात. मात्र ही सगळी वैशिष्ट्येे असलेल्या दक्षिण कोरिया पर्यटकांसाठी सहज फिरण्याची संधी सहजासहजी देत नाही. मात्र दक्षिण कोरियाला भेट देण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे हे नक्की. 

seol _1  H x W: 
 
 
आधुनिकतेबरोबर पारंपरिक वारसा जपलेला हा देश. समृद्ध पारंपरिक व आधुनिक कलेचा सुंदर मिलाप येथे घडून आला आहे. येथे पर्यटनासाठी अनेक ठिकाणे आहेत, मात्र आज आपण माहिती घेतो आहोत, ती या देशाची राजधानी ‘सिओल’ची. सिओल द. कोरियाची नुसती राजधानीच नाही तर ते या देशाचे प्रमुख आर्थिक व राजकीय केंद्रही आहे. गजबजलेले शहर असूनही येथे शांतता मिळू शकते तसेच नाईट लाईफ जगण्याची संधीही येथे मनसोक्तपणे अनुभवता येते.
 
 
या शहरातील अनेक जागा जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाल्या आहेत. सेओलची खरी ओळख आहे, ती स्ट्रीट फुडची. रस्त्यांवर स्ट्रीट फुड पुरविणार्‍या गाड्यांच्या लांबचलांब रांगा येथे पाहायला मिळतात. झगमगत्या प्रकाशात त्यांची शोभा आणखीनच वाढते. या शहराला ‘होम ऑफ स्ट्रीट फुड’ असे सार्थ नावही दिले गेले आहे. सेओल हे मोठे व महत्त्वाचे शैक्षणिक केंद्रही आहे. तसेच बौद्ध मठांचे प्रमाणही येथे मोठे आहे.
 
 
येथील इमारतीत प्राचीन इमारती आहेत, तशाच अत्याधुनिक इमारतीही आहेत. येथील फायनान्स बिल्डिंग, एस सिओल टॉवर, वर्ल्ड ट्रेंड सेंटर, सेव्हन स्कायस्क्रॅपर रेसिडेंस टॉवर पॅलेस या त्यातील काही मुख्य इमारती. येथील बुसान किनार्‍यावरून दिसणारा सूर्योदयाचा नजारा डोळ्यांचे पारणे फेडणारा. नववर्षाच्या स्वागताला जगभरातून अनेक पर्यटक येथे गर्दी करतात. तसेच ‘आयलंड ऑफ गॉडस’ नावाने ओळखले जाणारे जाजू बेट हे विदेशी पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. ज्वालामुखीचा हा प्रदेश आहे. त्यामुळे ‘काला पत्थर’ जागोजागी दिसतो. तसेच कधीही पाऊस कोसळतो. हनीमून कपल्सचे हे आवडते पर्यटन स्थळ आहे.
 
 
पानगळच्या दिवसांत येथील जंगले लाल, पिवळ्या पानांची जणू रंगून जातात. येथील पर्वत, नद्याही पाहण्यासाठी आवर्जून यावे, असे त्यांचे सौंदर्य आहे. येथे काही मंदिरेही आहेत. तसेच नॅशनल पार्क हे खास पर्यटन स्थळ आहे.
दक्षिण कोरियासाठी दिल्लीहून थेट विमान सेवा आहे. साधारण 15 ते 18 हजार विमान भाडे असून अनेक भारतीय टुरिस्ट कंपन्या अगदी माफक दारात दक्षिण कोरियाची टूर आयोजित करतात. दक्षिण कोरियाला जाण्याकरिता थंडीचे दिवस फार सोयीस्कर आहे. साधारण दक्षिण कोरियाला पाऊस भरपूर असतो आणि उन्हाळा हा मोजकाच असतो, त्यामुळे ऑक्टोबर ते जुलै या दरम्यान दक्षिण कोरियाची ट्रिप नक्कीच सुखदायक राहू शकते. दक्षिण कोरियाला भारतीय व्यंजन मिळत नाही आणि तेथे 90 टक्के मांसाहारी रेस्टॉरेंट आहेत, त्यामुळे तुम्हाला कोरियन फुडची सवय करून घ्यावी लागेल मात्र जर तुम्ही भारतीय टुरिस्ट कंपनी बरोबर जाणार असाल तर ते लोक अशी भारतीय जेवणाची सोया करतात एक भारतीय रुपयात तुम्हाला 16 कोरियन यौन मिळेल, म्हणजे भारतीय रुपयांत कोरियतन यौनपेक्षा मजबूत असल्याने तुम्ही फार कमी रुपयात दक्षिण कोरिया फिरू शकता.