युक्रेन विमान अपघात प्रकरणी काही जणांना अटक

    दिनांक :14-Jan-2020
-इराणच्या न्यायालयीन यंत्रणेची माहिती
तेहरान,
युक्रेन विमान अपघात प्रकरणात अटकसत्र राबवण्यात आले असून, काही जणांना अटक करण्यात आल्याची माहिती इराणच्या न्यायालयीन यंत्रणेने दिली आहे. युक्रेनच्या विमानाने तेहरान विमानतळावरून उड्डाण करताच, ते चुकीने पाडण्यात आले होते. यामध्ये विमानातील सर्वच 176 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. इराणच्या सुरक्षा दलांनी चुकीने हे विमान पाडले होते. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन केले जाईल, अशी घोषणा इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी केली होती. त्यानंतर इराणकडून ही माहिती देण्यात आली.
 

ukren_1  H x W: 
 
या अपघाताची बारकाईने चौकशी केली जात असून, काही जणांना अटक करण्यात आली, असे न्यायालयीन यंत्रणेचे प्रवक्ते घोलमहुसेन इस्माइली यांनी सांगितल्याचे वृत्त इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमाने दिले. मात्र, त्यांनी अटक केलेल्यांची नावे जाहीर करण्यास िंकवा किती जणांना अटक केल्याची माहिती देण्यास नकार दिला. युक्रेनचे हे विमान क्षेपणास्त्र हल्ल्यात कोसळल्याचा आरोप सुरुवातीला इराणने फेटाळला होता. त्यानंतर रिव्होल्युशनरी गाडर्‌‌सने चुकीने प्रवासी विमान पाडल्याची कबुली इराणने दिली होती.