घाऊक महागाईचा दर 2.59 टक्क्यांवर

    दिनांक :14-Jan-2020
नवी दिल्ली,
भाजीपाला आणि अन्य खाद्यान्नांच्या वाढलेल्या किमतींमुळे किरकोळ महागाई दर 7.35 टक्क्यांवर गेला असतानाच, आज मंगळवारी घाऊक महागाईच्या दराची आकडेवारी समोर आली. डिसेंबर महिन्यात घाऊक महागाई 2.59 टक्क्यांवर गेली असल्याचे यात दिसून आले.
 

mahagai_1  H x  
 
केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाने आज याबाबातचा अहवाल जाहीर केला. नोव्हेबर महिन्यात हा दर 2.58 टक्के इतका होता. घाऊक महागाईच्या दरात वाढ होण्यासाठीही कांदा आणि इतर खाद्यान्नांच्या किमतीतील वाढ कारणीभूत ठरली आहे.
 
 
 
डिसेंबर महिन्यात खाद्यान्नांच्या किमतीतील वाढ 13.12 टक्के इतकी होती. नोव्हेंबरमध्ये ही वाढ 11 टक्के होती. डिसेंबर महिन्यातच भाजीपाल्याच्या किमतीत 69.69 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर टोमॅटोच्या किमतीत 44.97 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले.