ऑस्कर २०२० नामांकने जाहीर; 'जोकर'चा दबदबा

    दिनांक :14-Jan-2020
कॅलिफोर्निया,
ऑस्कर हा सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठीत चित्रपट पुरस्कार म्हणून ओळखला जातो. यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांची नामांकन यादी नुकतीच जाहिर झाली. जगभरातले सिनेमेप्रेमी या पुरस्कारांची आतुरतेने वाट पाहत असतात. १० फेब्रुवारी रोजी (भारतीय वेळेनुसार) ऑस्कर सोहळा रंगणार आहे.
 
 
oscar_1  H x W:
 
या यादीत ११ नामांकनासह ‘जोकर’ हा चित्रपट पहिल्या स्थानावर आहे. मात्र या यादीत आणखी एक व्यक्ती असा आहे, जो खऱ्या अर्थाने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्यक्तिचे नाव जॉन विलियम्स असे आहे.
 
 
जॉन विलियम्स यांना ऑस्कर स्पर्धेतील सर्वात अनुभवी खेळाडू म्हणून ओळखले जाते. ८७ वर्षांच्या जॉन आजोबांना यंदा ‘स्टार वॉर्स: द राईज ऑफ स्कायवॉकर’ या चित्रपटातील गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट संगीतकार या विभागात नामांकन मिळाले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हे त्यांचे ५२ वे ऑस्कर नामांकन आहे.
 
 
१९६७ साली ‘वॅली ऑफ द डॉल्स’ या चित्रपटातील गाण्यासाठी त्यांना पहिल्यांदा ऑस्कर नामांकन मिळाले होते. तेव्हापासून आतापर्यंत गेल्या ५३ वर्षांत त्यांनी तब्बल ५२ ऑस्कर नामांकन मिळवली. १९७१ साली ‘फिडर ऑन द रुफ’ या गाण्यासाठी त्यांना पहिल्या ऑस्कर मिळाला होता. त्यांनी आपल्या कारकिर्दीत तब्बल पाच पुरस्कार पटकावले आहेत.
 
 
 
हॅरी पॉटर, स्टार वॉर्स, सुपरमॅन, इंडियाना जोन्स यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांसाठी संगीत निर्मिती करणारे जॉन विलियम्स आपल्या कारकिर्दीत जवळपास प्रत्येक वर्षी ऑस्करसाठी नामांकित झाले आहेत. यंदाच्या वर्षी त्यांच्यासमोर १९१७, फोर्ड वर्सेस फरारी, जोकर यांसारख्या दमदार चित्रपटांचे आव्हान आहे. त्यामुळे यंदा ते सहाव्या ऑस्करवर नाव कोरतात का हे नक्कीच पाहाण्याजोगे ठरेल.
 
 
 
यावर्षी क्विंटन टरँटिनोचा 'वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड' आणि टोड फिलिप्सचा 'जोकर' ऑस्करच्या स्पर्धेत सर्वात पुढे आहे. भारताकडून ऑस्करसाठी झोया अख्तरचा 'गली बॉय' हा सिनेमा पाठवण्यात आला होता. तो स्पर्धेबाहेर गेला आहे. मात्र, भारताला अजूनही एक संधी आहे.
 
 
 
शेफ ते फिल्ममेकर प्रवास करणाऱ्या विकास खन्नाचा 'द लास्ट कलर' हा पदार्पणातील सिनेमा ऑस्करसाठी पाठवण्यात आला आहे. अभिनेत्री नीना गुप्ता यांची यात प्रमुख भूमिका आहे. बेस्ट फिचर फिल्म कॅटेगरीत हा सिनेमा ऑस्करसाठी पाठवण्यात आला आहे.
 
  
 
सर्वोत्तम सिनेमा, सर्वोत्तम दिग्दर्शन, सर्वोत्तम अभिनेता, ओरिजनल स्कोर, संकलन, सिनेमॅटोग्राफी, पटकथा अशा सात विभागांमधील नामांकनांमध्ये 'जोकर' ने बाजी मारली आहे.