निर्देशांक नव्या उंचीवर

    दिनांक :14-Jan-2020
मुंबई,
सकाळच्या घसरणीतून सावरताना, मुंबई शेअर बाजाराने आज मंगळवारी 93 अंकांची कमाई करीत, आजवरचा सर्वोच्च शिखर गाठला आहे. राष्ट्रीय शेअर बाजारही नव्या उंचीवर पोहोचला आहे. सत्राची सुरुवात सुमारे 100 अंकांच्या घसरणीने झाली. यानंतर बाजारात चढ-उतार पाहायला मिळाला.
 
 
sen_1  H x W: 0
 
दुपारच्या व्यवहारात कमाईचा आकडा 160 पेक्षा जास्त जात, निर्देशांक 41,996 अशा ऐतिहासिक पातळीवर गेला होता. दिवसभराच्या उलाढालीनंतर शेअर बाजाराचा निर्देशांक 92.94 अंकांच्या कमाईसह 41,952.63 या स्तरावर बंद झाला. आजच्या व्यवहारात हिरो मोटर्स, एचडीएफसी, आयटीसी, अॅक्सिस बँक आणि टीसीएस यासारख्या कंपन्यांना चांगला फायदा झाला. तर दुसरीकडे इंडसइंड बँक, रिलायन्स, कोटक बँक, स्टेट बँक, ओएनजीसी आणि आयसीआयसीआय बँकेला नुकसान सहन करावे लागले. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही 32.75 अंकांची कमाई केली. दिवसभराच्या व्यवहारानंतर निफ्टी 12,362.30 या स्तरावर बंद झाला.