गारठवणाऱ्या थंडीत सापडली जुळी अर्भक; पुण्यातला धक्कादायक प्रकार

    दिनांक :14-Jan-2020
 


twins found in pune_1&nbs
पुणे,  
गारठवून टाकणाऱ्या थंडीने माणसातल्या माणुसकीही गारठवून टाकले आहे. पहाटेच्या थंडीत  पुण्यातील पाषाण तलावाजवळ जुळी अर्भके आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना ही जुळी अर्भक दिसली. त्यानंतर हा प्रकार समोर आला. मंगळवारी सकाळी आठ वाजता काही नागरिक नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला जात होते. पाषाण तलावाजवळून जात असताना नागरिकांना ब्लँकेटमध्ये दोन जुळी नवजात अर्भक गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आली. ही दोन्ही बालक एक दिवसाची असून थंडी आणि  भुकेने व्याकुळ झाल्याने रडत होती. परिसरातील नागरिकांनी दोन्ही बाळांना दूध पाजले, त्यानंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी आले. त्यानंतर दोन्ही बालकांना, रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर आयसीयुमध्ये उपचार सुरु असून, दोघांची तब्येत धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच या बालकांना कोणी या ठिकाणी सोडले याबाबतचा तपास पोलीस करीत आहे.