अवॉर्ड शो फक्त पैश्यांसाठी करतो : शेट्टी

    दिनांक :02-Jan-2020
मुंबई,
बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीने अॅवॉर्ड शोंबद्दल एक विधान केले असून, या विधानामुळे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. रोहित शेट्टीने केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
 
rohit_1  H x W:
 
बॉलिवूडमध्ये होणाऱ्या अॅवॉर्ड शोबद्दल रोहितने आपले मत मांडले आहे. बॉलिवूडमध्ये होणारे अॅवॉर्ड शो बनावट असतात, असा दावा रोहित शेट्टीने केला आहे. अभिनेत्री नेहा धूपिया हिच्या चॅट शोमध्ये रोहित शेट्टी सहभागी झाला होता. त्यावेळी त्याने हा दावा केला आहे.
 
 
 
एखाद्या पुरस्कार सोहळ्यात माझ्या चित्रपटाला पुरस्कार देण्यात येणार असेल किंवा तो सोहळा होस्ट करण्यासाठी मला पैसे मिळणार असतील, अशाच पुरस्कार सोहळ्याला मी उपस्थित राहतो. अन्यथा मी पुरस्कार सोहळ्याला जात नाही. कारण ते बनावट असतात. एका दूरचित्रवाणीवरील डेली सोपसारखेच ते भासतात, असेही रोहित म्हणाला.