नीना गुप्तांच्या सिनेमाला ऑस्कर नामांकन

    दिनांक :02-Jan-2020
मुंबई,
सेलिब्रिटी शेफ ते फिल्ममेकर असा प्रवास करणाऱ्या विकास खन्ना यांचा पहिलाच सिनेमा द लास्ट कलरला ऑस्कर पुरस्कारातील फीचर फिल्मच्या यादीत नामांकन मिळाले आहे. स्वतः विकास यांनी सोशल मीडियावर याची माहिती दिली. पहिल्याच सिनेमाला ऑस्करमध्ये नामांकन मिळाल्यामुळे सध्या विकास खन्ना फार आनंदी आहे.
 

neena gupta_1   
 
विकासने आपल्या ट्विटरवर लिहिले की, २०२० ची सर्वात चांगली सुरुवात. जादू.. ऑस्कर अकादमीने २०१९ मधील सर्वोत्तम ३४४ सिनेमांची घोषणा केली. यात द लास्ट कलर सिनेमाचा समावेश आहे. साऱ्यांना धन्यवाद. लास्ट कलर सिनेमातील अभिनेत्री नीना गुप्ता यांनी विकास यांच्या ट्वीटला रीट्वीट करत म्हटके की, माझा विश्वास बसत नाहीये. मी खूप आनंदी आहे. याशिवाय नीना आणि विकास यांनी आपला आनंद व्यक्त करण्यासाठी अजून एक पोस्ट लिहिली.
 
 
 
 
मीडिया रिपोर्टनुसार, या यादीत कोणत्याही सिनेमाचे नाव येण्याआधी सिनेमा लॉस एन्जेलिस येथील कमर्शल मोशन पिक्चर थिएटरमध्ये ३१ डिसेंबरआधी प्रदर्शित करावा लागतो. एवढंच नाही तर कमीत कमी ७ दिवस तो सिनेमा थिएटरमध्ये यशस्वीरित्या चालावा लागतो.
 
 
 
 
‘द लास्ट कलर’ सिनेमा अमेरिकेत ३० व्या पाम स्प्रिंग्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये ४ जानेवारी २०१९ ला प्रदर्शित करण्यात आला होता. हा सिनेमा भारतात अजून प्रदर्शित झाला नसून गेल्यावर्षी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये सिनेमाचे स्क्रीनिंग ठेवण्यात आले होते.  द लास्ट कलर सिनेमात वृंदावन आणिवाराणसीमध्ये राहणाऱ्या विधवा स्त्रियांची कहाणी सांगण्यात आली आहे.