चहा प्या; कर्करोग टाळा

    दिनांक :03-Jan-2020
भारत आणि पाकिस्तान या देशांत पिकणारी चहाची एक विशिष्ट प्रजाती कर्करोगावर रामबाण औषधी असल्याची माहिती संशोधनातून पुढे आली आहे. या प्रजातीचा चहा प्रामुख्याने स्तनांच्या कर्करोगावर अत्यंत गुणकारी असून त्यापासून कोणतेही अपाय होत नसल्याचे संशोधकांना आढळले आहे. 
 
bharat _1  H x
 
 
बर्मिंगहॅम येथील एस्टन युनिव्हर्सिटी आणि रसेल्स हॉल हॉस्पिटल येथील संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार ‘फ्रेगोनिया क्रेटिका’ या नावाची चहाची एक प्रजाती केवळ भारत आणि पाकिस्तानातील कोरड्या हवामानात पिकते. या वनस्पतीमध्ये कर्करोगाचा विनाश करणारे शक्तिशाली घटक आहेत. या घटकामुळे केमोथेरेपीच्या उपचारामुळे मिळणार्‍या परिणामासारखेच परिणाम मिळतात. मात्र केमोथेरेपीप्रमाणे त्यापासून इतर कोणतेही अपाय होत नाहीत.
 
 
शरीरात अस्तित्वात असलेल्या कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्याबरोबरच नवीन पेशींची निर्मिती थांबविण्याचे कामही ही वनस्पती करते; असा संशोधकांचा दावा आहे. या वनस्पतीमधील औषधी घटक 5 तासांत कर्करोगाच्या पेशीचा प्रसार रोखते आणि 24 तासांत त्यांचा नाश करते; असे प्रयोगशाळेत सिद्ध झाले आहे.