किशोरी विकास काळाची गरज

    दिनांक :03-Jan-2020
डॉ. अपर्णा आल्हाद सदाचारे
 
आजच्या काळात प्रगतीसोबत अनेक आव्हान आपल्यासमोर आले आहेत. यात सोशल मीडिया आणि त्यातून होणारे दुष्परिणाम यांची भर आहे. मुलांच्या मनावर, डोळ्यांवर खूप विपरीत परिणाम होताना दिसतोय्‌. भूक मंदावणे, रोगप्रतिकारकशक्ती कमी होणे, अशक्तपणा (भारतात जवळपास 70% मुलींना हा त्रास आहे), पाळीची अनियमितता, केस गळती, त्वचेच्या समस्या, थायरॉईड इत्यादी अनेक गोष्टी पाहायला मिळतात. 

chotu_1  H x W: 
 
 
याची कारणे- अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, रात्री उशिरापर्यंत जागरण करणे, सोशल मीडियाचा नको तितका वापर, वारंवार बाहेर खाणे अशा अनेक गोष्टी सुद्धा आपण अनुभवतो. याचबरोबर मानसिक ताण मग तो अभ्यासाचा असो की नोकरीचा आत्मकेंद्रित विचारसरणी, संयमाचा अभाव, एकलकोंडेपणा यामुळे ज्या अनेक मानसिक आणि त्यातून तयार होणार्‍या शारीरिक समस्या निर्माण होतात, त्यामुळे ही पिढी प्रगती करतानादेखील सुदृढ आहे, असे आपण म्हणू शकत नाही, तर वैद्यकीय दृष्टीने सुदृढ पिढी घडावी, यासाठी काय करावे, हे आपण पाहूया....
 
 
 
व्यायामाचे महत्त्व -नियमित 40 मिनिटे व्यायाम केल्याने शरीरातील नकारात्मक संप्रेरके कमी होऊन सकारात्मक संप्रेरके वाढतात आणि आनंद आणि उत्साहाचा अनुभव होतो.
 
 
योग्य आहार घेतल्याने आपल्या शरीराला पोषक घटक मिळतात, त्यातून शारीरिक दृष्टीने सक्षम होण्यास मदत होते. अर्थातच रोग प्रतिकारशक्ती वाढीला लागते, त्यामुळे आजारी पडण्याचं प्रमाण कमी होते. सोशल मीडियाचा संयमित वापर केल्याने मेंदू आणि डोळे निरोगी राहतात. जास्त प्रमाणात वापर केल्याने मनावर आणि बुद्धीवर विपरीत परिणाम होतात आणि नकारात्मकता वाढते. मैदानी खेळाने मनोबल आणि शारीरिक बळ वाढते. तसेच रोज ठराविक वेळी नियमित प्रार्थना केल्याने सीरोटॉनिनसारखे हार्मोन्स तयार होतात, जे आनंदी जीवनासाठी फार उपयुक्त आहेत. आजच्या काळात प्रगती करायची असेल तर मन आणि शरीर सुदृढ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

9823647612