'भुज : द प्राइड ऑफ इंडिया' चा फर्स्ट लूक रिलीज

    दिनांक :03-Jan-2020
मुंबई,
चित्रपट दिग्दर्शक अभिषेक दुधियाने आपला आगामी चित्रपट 'भुज : द प्राइड ऑफ इंडिया' चा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. अजय देवगन या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अजय देवगन 'भुज : द प्राइड ऑफ इंडिया' या चित्रपटात वायुसेना अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे.
 

bhuj _1  H x W: 
 
'भुज : द प्राइड ऑफ इंडिया'चा फर्स्ट लूकबाबत बोलायचे झाले, तर यामध्ये अजय देवगनने भारतीय वायुसेना अधिकाऱ्याच्या वर्दीत दिसून येत आहे. अजयच्या मागे भारतीय वायुसेनेचे एक विमान दिसत आहे. ज्यावर भारतीय तिरंगा दिमाखात फडकताना दिसत आहे. चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज होताच, फॅन्समध्ये चर्चा रंगल्या आहेत. चित्रपटाचा पहिला लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
 
 
 
 
चित्रपटाची कथा 1971 मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धावर आधारित आहे. चित्रपट यावर्षी 14 ऑगस्टला रिलीज होणार आहे. या चित्रपटात अजय देवगन स्कॉड्रन लीडर विजय कर्णिक यांच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, स्कॉड्रन लीडर विजय कर्णिक यांनी 1971च्या लढाई दरम्यान महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी पाकिस्तानच्या सर्व एअरस्पेसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते.