पाणी पिताना घ्या काळजी

    दिनांक :31-Jan-2020
 
 
 
aarogya 31 jan_1 &nb
 
 
भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. अस्वच्छ पाण्यावाटे विविध बॅक्टेरिया शरीरात जाण्याची शक्यता असल्याने स्वच्छ पाणी पिण्याकडेआपला कल असतो. पण ऑफिसमधलं िंकवा बाहेरचं पाणी स्वच्छ असेलच असं नाही. पाणी पिताना आपण कोणत्या चुका करतो याविषयी...
* ऑफिसमध्ये पाणी थंड करणारे कूलर असतात. पण ते वरचेवर स्वच्छ केले जातातच असं नाही. कूलर नियमित स्वच्छ केले जात असले तरी त्यात बॅक्टेरिया असू शकतात. नॅशनल सायन्स फाउंडेशन इंटरनॅशनलच्या अहवालानुसार पाण्याच्या कूलरच्या एक चौरस इंच जागेत 2.7 दशलक्ष बॅक्टेेरिया असू शकतात.
* छोट्या कार्यालयांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नळ बसवलेले असतात. नळाच्या पाण्यात घातक घटक असू शकतात. या पाण्यात धातू, खनिजांचे कण तसंच मीठ असू शकतं. यातले काही घटक आरोग्यासाठी गरजेचे असले तरी बरेच घटक हानीकारक असू शकतात.
* बाटलीबंद िंकवा प्लास्टिकच्या सीलबंद कॅनमधलं पाणी शुद्ध असल्याचा आपला समज असतो. पण या पाण्यात हवेतले प्रदुषित घटक असू शकतात. बाटल्यांच्या उघड्या तोेंडामधून बॅक्टेरिया पाण्यात जाऊ शकतात.
* दूषित पाण्याशी होणारा संपर्क टाळण्यासाठी घरातूनच पाण्याची बाटली घेऊन जा. हे शक्य नसेल तर कार्यालयात कोमट पाणी प्या. कोमट पाण्यात बॅक्टेरियांची संख्या तुलनेने बरीच कमी असते.