दीपिकाला चाहत्याकडून मिळाले अनोखे सरप्राइज

    दिनांक :05-Jan-2020
मुंबई,
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आज तिचा ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. येत्या १० तारखेला दीपिकाचा छपाक सिनेमा प्रदर्शित होत असल्यामुळे ती आजही सिनेमाचे प्रमोशन करताना दिसणार आहे. दरम्यान, मुंबईतून लखनऊमध्ये ती सिनेमाच्या प्रमोशनला जात होती. यावेळी, रणवीर सिंग तिला विमानतळावर सोडायला आला होता. यावेळी चाहत्यांकडून तिचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. सध्या त्यांचा हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 

deepika bdy_1   
 
एअरपोर्टवर दीपिकाला तिच्या एका चाहत्याने वाढदिवसाचे अनोख सरप्राइज दिले. त्याने एअरपोर्टवरच चक्क केक आणला आणि तिला तो कापण्याची विनंती केली. आपल्या चाहत्याकडून असे मिळालेले सरप्राइज पाहून ती भारावून गेली. चाहत्याच्या या विनंतीला मान देऊन तिने रणवीरसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला. तिथे उपस्थित असलेल्या एका छायाचित्रकाराने एअरपोर्टवरचे दीपिकाच्या वाढदिवसाचे क्षण कॅमेरात टिपले. सध्या हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
 
 
 
 
यावेळी दीपिका आणि रणवीर एअरपोर्टवर फंकी लुकमध्ये दिसले. रणवीरने डेनिम आणि ओव्हरसाइज्ड विंटर स्वेटर घातला होता. तर दीपिका निळ्या रंगाचा शर्ट आणि त्यावर ओव्हर साइज नारंगी रंगाच्या स्वेटर घातला होता.