परेश रावल साकारणार अब्दूल कलामांची व्यक्तिरेखा

    दिनांक :05-Jan-2020
मुंबई,
बॉलिवूडमध्ये संजय दत्त, मेरी कॉम, एम.एस. धोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकनंतर आता आणखी एका बायोपिकची तयारी सुरू झाली आहे. भारताचे माजी राष्ट्रपती आणि शास्त्रज्ञ भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दूल कलाम यांच्या जीवनावर आधारीत बायोपिक तयार करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात परेश रावल कलामांची व्यक्तिरेखा साकारणार आहेत.
 

apj abdul kalam-paresh ra 
 
आपल्या दमदार अभिनयाने बी- टाउनमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करणारे परेश रावल बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहेत. चतूरस्त्र अभिनय कौशल्याने परेश यांनी नायक, खलनायक, सहकलाकार अशा सर्वच भूमिका लिलया पेलल्या. आता ते कलामांची भूमिका साकारायला सज्ज झाले आहेत. स्वतः रावल यांनी ट्विटरवरून याची माहिती चाहत्यांना दिली.
 
 
 
 
ट्विटरवर कलामांचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले, माझ्या मते, कलाम हे संत कलाम होते. पडद्यावर कलामांची व्यक्तिरेखा साकारण्याचे संधी मला मिळाल्याने मी फार नशीबवान आहे.
 
याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा रावल यांनी बोलून दाखवली होती. मात्र, काही कारणांमुळे त्यांना या सिनेमात काम करता आले नाही. त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकमध्ये अभिनेता विवेक ओबेरॉयने मोदी यांची भूमिका साकारली. यानंतर, ते राजकारणातही उतरले. गेल्या लोकसभेत ते भाजपकडून अहमादाबाद येथून निवडून आले होते. यंदाच्या लोकसभेत मात्र त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला.
 
सध्या ते राजकारणापेक्षा सिनेमांकडे जास्त लक्ष देत असल्याचे बोलले जात आहे. आता एपीजे एब्दुल कलाम यांच्या बायोपिकमध्ये परेश रावल स्वतःची छाप कितपत पाडतात हे तर येणारा काळच ठरवेल. पण, अनेक महिन्यांनंतर त्यांना पुन्हा रुपेरी पडद्यावर पाहण्यास त्यांचे चाहते उत्सुक असतील यात काही शंका नाही.