'शिकारा'चा ट्रेलर प्रदर्शित

    दिनांक :07-Jan-2020
मुंबई,
दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांचा बहुप्रतिक्षित शिकारा- द अनटोल्ड स्टोरी ऑफ काश्मिरी पंडीतचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. सिनेमात काश्मिरी पंडितांची कथा सांगण्यात आली आहे. सिनेमात तेव्हाचा काळ दाखवण्यात आला जेव्हा काश्मीरमध्ये पंडितांवर अत्याचार करण्यात आले होते. सिनेमात काश्मिरी पंडितांच्या व्यथा आणि त्यांच्यावर झालेले अत्याचार दाखवण्यात आले आहेत. एकंदरीत 'शिकारा' ट्रेलरमधून सिनेमा पाहण्याची इच्छा अधिक दृढ होताना दिसते.
 
shikara_1  H x
 
 
विधू विनोद चोप्रा यांनीच या सिनेमाची निर्मिती केली असून त्यांनीच या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. आदिल खान आणि सादिया हे दोन नवे चेहरे या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. आदिलने शिवकुमार धरची व्यक्तिरेखा साकारली आहे तर सादियाने शांतीची व्यक्तिरेखा साकारली आहे.
सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी निर्मात्यांनी सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होते. यातील एका पोस्टरमध्ये एक मुलगा आणि मुलगी हातात सामान घेऊन खिन्नपणे चालताना दिसत आहेत. तर त्यांच्या मागे हजारो लोकांची गर्दी दिसत आहे. याआधी सिनेमाचं मोशन पोस्टर शेअर करण्यात आलं होतं. यावर '१९९० मध्ये स्वतंत्र्य भारतात सर्वात मोठं पलायन झालं. ज्यात ४ लाख काश्मिरी पंडितांना कश्मीर खोरं सोडावं लागलं. ३० वर्षांनंतर शिकारामधून ही कहाणी पुन्हा सांगण्यात येईल.'
७ फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणा असून सत्य घटनेवर आधारित या सिनेमाला मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळत आहे. विस्थापित कश्मिरी पंडितांच्या व्यथेसोबतच तेव्हा काश्मिरची काय अवस्था होती आणि पाकिस्तानची प्रतिक्रियाही स्पष्टपणे सिनेमात दाखवण्यात आली आहे.