'छपाक'च्या प्रदर्शनाचा अखेर मार्ग मोकळा

    दिनांक :08-Jan-2020

chhapaak 1_1  H 
 
 
मुंबई,
अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या 'छपाक' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रदर्शनावरील स्थगितीची मागणी याचिकाकर्त्यांनी मागे घेतली आहे. सत्यघटनेवर आधारित चित्रपटाच्या कथेवर कॉपीराइट कसा होऊ शकतो, असा सवाल मुंबई हायकोर्टाने उपस्थित केल्यानंतर याचिकाकर्त्यांनी स्थगितीची केलेली मागणी मागे घेतली.