हे आहेत रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे घटक

    दिनांक :10-Oct-2020
|
देहाची तिजोरी 
 
तुम्ही करत असलेली प्रत्येक चांगली-वाईट गोष्ट तुमच्या आरोग्यावर परिणाम करत असते. अनेकदा आरोग्याशी निगडीत अनेक साध्या सोप्या गोष्टींकडे आपले दुर्लक्ष होते. गेल्या सहा महिन्यांपासून आपण सर्वच कोरोनाच्या जागतिक महामारीने ग्रासलो आहोत. आजवर या संसर्गाने कित्येक लोकांचे बळी घेतले आणि सुदैवाने अनेक लोक या आजारातून बरे सुद्धा झाले आहेत.

inmmunity_1  H  
 
सुरुवातीला तर लहान मुले आणि वृद्धांनाच या आजाराचा जास्त धोका होता, परंतु आजच्या स्थितीत आबालवृद्धांसोबतच तरुणांनासुध्दा या आजाराचा धोका वाढलाय्. सरासरी या आजारातून बरे होणार्‍यांची संख्या जरी जास्त असली तरी त्या मागील एक अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे त्या रुग्णाची किंवा त्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती.
 
आज जागतिक पातळीवर कोरोनाची लस तयार करण्याचे जे कार्य झपाट्याने सुरू आहे. सर्व वैज्ञानिक सातत्याने ज्या लसीच्या निर्मितीसाठी प्रयत्न करताहेत, त्यात प्रामुख्याने ‘रोगप्रतिकारशक्ती’ वाढविणार्‍या घटकांचा समावेश आहे. मोठमोठ्या रुग्णालयात देखील कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी याच घटकांचा आहारात समावेश केला जात आहे.ज्याला आपण ढकएठझएणढखउ ऊखएढ किंवा उपचारात्मक आहार, असे म्हणतो. तेव्हा आज आपण सहज मिळणार्‍या अन्नघटकांविषयी माहिती घेऊ, जे आपणास व आपल्या परिवारास विषाणूंचा संसर्ग होण्यापासून संरक्षण करण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.
 
- गुळवेल : यात कॅल्शियम, फॉस्फरस, प्रोटीन हे घटक असतात व शिरांमध्ये स्टार्चची मात्रा आढळते. यामुळे शरीराचे अग्निवर्धन होते व पचनकार्य चांगले होते. वरचेवर होणारी सर्दी, खोकला, ताप यासाठी गुळवेल हितावह ठरते. रक्तातील दोष नाहीसे करून त्वचारोग कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच शारीरिक कष्टामुळे येणारा ताण कमी करण्यासाठी सुद्धा गुळवेल उपयुक्त ठरते.
 
- ओवा : यात थायमॉल नावाचे रासायनिक घटक असते. ओव्याच्या एंटी स्पाझ्मॉटिक प्रभावामुळे मासिक वेदना व क्रॅम्प्समध्ये आराम मिळतो. श्वसनात्मक आरोग्यासाठी तसेच सामान्य पडसे, खोकला व दमा यासाठी ओवा उपयुक्त ठरतो. गॅस, अ‍ॅसिडीटी, पोटांतील कळा, पोटदुखी, पोटफुगी, अपचन यासाठीसुद्धा ओवा प्रभावी ठरतो.
 
- हळद : आरोग्यासाठी खूप गुणकारी मानली जाते. यात आढळणार्‍या ‘करफ्यूमिन’मध्ये औषधीय गुण असतात.
रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासोबतच इंफेक्शन, अ‍ॅलर्जी आणि अंतर्गत जखम भरून काढण्यासाठी हळदीचा फायदा होतो. श्वसननलिकेत होणारी सूज कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. अस्थमा, ब्रॉन्कायटीस आणि खोकल्यावर सुद्धा हळद गुणकारी आहे.
 
- जीवनसत्त्व क : हे रोगप्रतिकारशक्ती प्रणालीला चालना देते. तसेच ऑक्सीडेटिव्ह ताणापासून शरीराचे रक्षण करते. त्वचा, रक्तवाहिन्या, हाडे व कुर्चा यांचा प्रतिपाळ करते. जखम भरून काढण्यास तसेच कर्करोगासारख्या आजारावर निश्चितपणे उपयुक्त ठरते. ब्रोकोली, लाल व हिरवी भोपळी मिरची, सलगम कंद व त्याचे झाड, हिरव्या भाज्या, पालक, पानकोबी, फुलकोबी या भाज्या तसेच किवी, पेरू, पपई, संत्री, गोड आणि पांढरा बटाटा, टोमॅटोे, हिवाळी फळांपासून तयार केलेले पेय यात जीवनसत्त्व क भरपूर प्रमाणात असते.
 
- जीवनसत्त्व अ : पेशींची नवनिर्मिती करण्यास, पुनर्उत्पादनाचे कार्य योग्य प्रकारे करण्यास, गर्भाची व भ्रूणाची योग्य प्रकारे वाढ होण्यास जीवनसत्त्व अ उपयुक्त आहे. रोगप्रतिकार प्रणालीचे उत्तम व्यवस्थापन करणे व त्वचेला टवटवीत ठेवण्याचे काम हे अ जीवनसत्त्व करते. गाजर, ब्रोकोली, स्क्वॅश, गोड खरबूज यात भरपूर प्रमाणात हे जीवनसत्त्व अ असते.
 
- जीवनसत्त्व ई : हे आठ चरबी विद्रव्य जीवनसत्त्वांचा समूह असून पेशी आवरणाचे संरक्षण करणे, हे याचे मुख्य काम आहे. हृदयरोग, वयासंबंधित होणारे डोळ्यांचे आजार यापासून संरक्षण करते. गहू जंतू तेल, सूर्यफुल तेल, केशर तेल, मका तेल तसेच डोंगरी बदाम, बदाम, सूर्यफुलाच्या बिया, हिरव्या पालेभाज्या व ब्रोकोली यात हे जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते.
 
- जीवनसत्त्व ड : हे एक चरबी विद्रव्य जीवनसत्त्व असून शरीरात कॅल्शियमचे शोषण करण्यास अत्यावश्यक आहे. हाडांचा विकास करणे, रोगप्रतिकार करण्याचे कार्य करणे व दाह अथवा जळजळ कमी करण्याचे काम हे जीवनसत्त्व ड करते. सूर्यप्रकाश हा या जीवनसत्त्वाचा मुख्य व उत्तम स्रोत आहे. बळकटीकरण केलेले म्हणजेच ऋेीींळषळशव दूध, दही, दुग्धजन्य पदार्थ, टोफू, अंडी यात हे ड जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात आहे. सूर्यप्रकाशाने शरीरात या जीवनसत्त्वाची निर्मिती होत असल्याने याला र्डीपीहळपश तळींराळप असेही म्हणतात.
 
- जीवनसत्त्व ब 12 : हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्त्व आहे. शरीरात याची निर्मिती होत नसल्याने आहाराद्वारेच याचे सेवन करावे. हे अतिशय आवश्यक जीवनसत्त्व असून शरीरात याचे अनेक महत्त्वाचे कार्य आहेत. नसांना निरोगी ठेवण्यासाठी व डीएनचे निर्मितीसाठी हे महत्त्वाचे ठरते. तसेच मेंदूचे सुरळीत कार्य व लाल रक्तपेशी यांचे व्यवस्थापन नीट होण्यासाठी जीवनसत्त ब 12 हे आवश्यक आहे. न्यूट्रीशनल यीस्ट, मॉझेरेला चिझ, मशरुम, परमेसा चीझ, योगर्ट, दूध यात हे जीवनसत्त्व असते.
 
वरील अन्नघटकांचा योग्य प्रकारे आहारात समावेश करून तसेच संतुलित आहाराचे सेवन करून आपण विषाणूंच्या संसर्गांपासून आपले संरक्षण करू शकतो. स्वस्थ खाओ, तन-मन जगाओ.
 
 - ऋतुजा शिंगरूप
९८३४५०६६२४