सव्वासात हजार बाधितांचा कोरोनाशी लढा

    दिनांक :15-Oct-2020
|
नागपूर,
नागपूर जिल्ह्यात ७३५१ रुग्ण प्रत्यक्ष कोरोनाशी लढा देत असून आज ६३० कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत ७८८४४ कोरोनामुक्त झाले असून आजचे ८८.५० टक्के प्रमाण सर्वाधिक आहे.
 
 
corona in nagpur_1 & 
 
नागपूर जिल्ह्यातील १०० रुग्णालये व काळजी केंद्र तसेच गृहविलगिकरणातील प्रत्यक्ष बाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून घट होत असल्याचे दिसून येत आहे.
 
 
आज ग्रामीणमध्ये २५०३ तसेच शहरात ४८४८, असे एकूण ७३५१ रुग्ण रुग्णालयात दाखल होते. काळजी केंद्र व रुग्णालयात फक्त २६०१ दाखल असून गृह विलगिकरणात ४७५० होते. सर्वाधिक मेडिकल रुग्णालयात २४१, मेयो रुग्णालयात १६१, त्या खालोखाल एसएमएचआरसी ८०, पाचपावली काळजी केंद्रात ७१, किंग्जवे रुग्णालयात ५८, मेडिट्रिना ५५, qहगणाच्या लता मंगेशकर रुग्णालयात ५०, लष्करी रुग्णालय कामठी ४९ रुग्ण दाखल आहेत.
 
 
रुग्णांची संख्याही कमी होत आहे. ७ ऑक्टोबरला ९७७५, ८ ऑक्टोबर ९४८९, ९ ऑक्टोबर ८८२८, १० ऑक्टोबरला ८६०६, ११ ऑक्टोबरला ८१३८, १२ ऑक्टोबरला ७८७२ रुग्ण, १३ ऑक्टोबरला ७५७९, १४ ऑक्टोबरला ७४१६ दाखल होते. गृहविलगिकरणाची संख्याही कमी होत आहे.
 
 
आज ५६८२ नमुन्यांच्या चाचणीत ५०९४ नमुने नकारात्मक आले. आज आरटीपीसीआर पद्धतीने ३५५७, रॅपिड अँटिजन पद्धतीने २१२५, असे एकूण ५६८२ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यात खाजगी प्रयोगशाळांत २२८, अँटिजन पद्धतीने १८१, मेयो ९३, मेडिकल ३७, नीरी प्रयोगशाळेत ३१,ा असे एकूण ५८८ नमुने सकारात्मक आले.
 
 
आज नागपूर शहरात ३३१ व ग्रामीणमध्ये २४९, जिल्ह्याबाहेरील ८ बाधित झाले असून ग्रामीणमध्ये १८८५३ व शहरात ६९७१८ तसेच जिल्ह्याबाहेरील ५१६ मिळून एकूण बाधितांची संख्या ८९०८७ वर पोहोचली. कोरोनाबाधित रुग्णांचा डबलिंग रेट १०६ दिवस इतका वाढला आहे. रोजची मृत्यूसंख्याही कमी झाली. मागील २४ तासात ग्रामीणमध्ये २, शहरात १३ तसेच जिल्ह्याबाहेरील ८, अशा २३ बाधितांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ग्रामीणमध्ये ५१५, शहरात २०४३, जिल्ह्याबाहेरील ३३४, असे एकूण २८९२ बाधितांच्या मृत्यूची संख्या झाली आहे. मृत्यूदर २.८९ टक्के आहे. आज ६३० कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत ७८८४४ कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे आजचे प्रमाण ८८.५० टक्के आहे.