बघा बबिता जी'चा ट्रेडिशनल लूक!

    दिनांक :15-Oct-2020
|
मुंबई,
प्रसिद्ध टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' गेल्या १२ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या शोमधील प्रत्येक व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा तयार केली आहे.हा शो प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना आवडतो. हा  शो फक्त लोकांना हसवतच नाही तर आपल्या आयुष्यातील नाती जपण्याचीही शिकवण देतो.'तारक मेहता का उल्टा चश्मा' शोमध्ये 'बबीता जी'ची भूमिका साकरणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता रियल लाइफमध्येही ग्लॅमरस आहे. ती शोमधील आपल्या उत्तम अभिनयासाठी ओळखली जाते.

b1_1  H x W: 0  
 
 
अभिनेत्री मुनमुन दत्ता सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळतं. तिचे ग्लॅमरस  फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.अभिनेत्री मुनमुन दत्ताचे इन्स्टाग्रामवर ३ मिलियन फॉलोअर्स आहेत. अभिनेत्री मुनमुन दत्ताने काही दिवसांपूर्वी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपले काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये मुनमुन साडीमध्ये तिचे सौंदर्य खुलून दिसत आहे.आतापर्यंत तिच्या या फोटोंना ३ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. अभिनेत्री मुनमुन दत्ताच्या सोशल मीडियावरील फोटोंवर कमेंट करत फॅन्स तिची स्माइल आणि दिसण्याची  प्रशंसा करत आहेत. अभिनेत्रीचा ट्रेडिशनल अवतार तिच्या चाहत्यांना फार  आवडला आहे.