नवदुर्गा उत्सव काळात शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करा

    दिनांक :15-Oct-2020
|
- जिपोअ वसंत परदेशी यांचे आवाहन 
मालेगाव,
सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. 17 ऑक्टोबर पासून नवरात्र उत्सवला सुरवात होणार असून, हा उत्सव 24 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. दसर्‍याच्या दुसर्‍या दिवशी देवीच्या मुर्तीचे विसर्जन होणार आहे. या काळात सर्व नागरीकांनी व उत्सव मंडळानी शासनच्या नियमाचे पालन करुण नवरात्र उत्सव साजरा करण्याचे आवाहन जिपोअ वसंत परदेशी यांनी केले.
 
 
wasant_1  H x W
 
मालेगाव शहर पोस्टेच्या प्रांगणात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. पवन बनसोड, पोस्टे चे पोनि आधारसिंग सोनोने, तहसीलदार रवी काळे, वीज वितरणचे अभियंता तायडे, नप उपाध्यक्ष संतोष जोशी आदींची उपस्थिती होती. प्रास्तविकात आधारसिंग सोनोने म्हणाले की, नवरात्र उत्सव काळात काही क्षेत्र कोरोना संदर्भात प्रतीबंधित झाल्यास त्या क्षेत्रात प्रतीबंधित क्षेत्रात सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा करण्यास मनाई राहिल. कोरोना विषाणुचा संसर्ग पाहता उत्सवामध्ये देवीच्या दर्शानासाठी येणारया भाविक करीता किंवा स्वंयसेवका करीता हँन्डवॉश, जंतूनाशक ठेवुन मास्क बंधनकारक करावा, असे आवाहन केले.
 
 
पुढे बोलतांना परदेशी म्हणाले, सार्वजनिक दुर्गात्सव करीता मंडळानी संबधीत नगरपंचायत किंवा ग्रामपंचायत कडुन लेखी परवानगीघ्यावी , सार्वजनिक जागा किंवा सार्वजनिक रोडवर मंडप उभारु नये , देवीच्या मुर्तीची ऊंची सार्वजनिक मंडळा करीता 4 फुट व घरगुती देवीच्या मुर्तीची ऊंची 2 फुटा पर्यंत मर्यादित असावी.मुर्तीची स्थापना विसर्जन वाहनात जास्तीत - जास्त 4 पेक्षा जास्त व्यक्ती राहनार नाहीत याची दक्षता मंडळानी घ्यावी तसेच मुर्तीचे विसर्जन घरी किंवा नगरपंचायत , ग्रामपंचयतने तयार केलेल्या कृत्रीम स्थळी विसर्जन करावे. आरती, भजन किंवा धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी फक्त 4 व्यक्ती हजर राहातील याची खबरदारी सार्वजनिक मंडळानी घ्यावी, असे ते म्हणाले. बैठकीचे सूत्रसंचालन व आभार गजानन काळे यांनी केले. या बैठकीला शांतता समिती सदस्य, पत्रकार, नवदुर्गा सदस्य, पोलिस पाटील व इतर प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.