परिपूर्णतेसाठी नवीन वाटा शोधाव्या : फ्लेमिंग

    दिनांक :15-Oct-2020
|
दुबई,
संघात केलेल्या बदलांमुळे पराभवाची मालिका खंडित झाली. आगामी सामन्यातही चेन्नई संघाने सामन्याच्या परिपूर्णतेसाठी नवीन वाटा शोधाव्या, अशी प्रतिकि‘या चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगने व्यक्त केली.
 
 
STEPHEN FLEMING_1 &n
 
सॅम करनला सलामी फलंदाज म्हणून पाठविण्याचा निर्णय, हा बदल सर्वात महत्त्वपूर्ण ठरला. करनने 21 चेंडूत 21 धावा काढल्या. प्रथम फलंदाजी करण्याबाबतच्या निर्णयाबाबत थोडी शंका होती. प्रथम फलंदाजी करण्याची ही आमची पहिलीच वेळ होती, परंतु खेळाडूंनी उत्कृष्ट फलंदाजी केली व हैदराबादविरुद्ध 6 बाद 167 धावा उभारल्या, असे तो म्हणाला. मात्र चेन्नईचा संघ अजूनही समतोल संघासाठी संघर्ष करीत आहे, त्यावर आम्ही कार्य करीत आहो, असे त्याने सांगितले.
 
 
चेन्नईचा पुढील सामना शनिवारी शारजाहमध्ये दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे, याबद्दल तो म्हणाला की, या सामन्यासाठी आमचा हाच परिपूर्ण संघ राहील असे सांगता येत नाही. आम्हाला नवीन खेळाडूनिशी नवीन मार्ग शोधावा लागेल, जे बहुदा त्यादिवशी चमकदार कामगिरी करू शकतील.